हिसवळ खुर्द ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द ईथे गिरणा धरणावरील ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या सदोष यंत्रणेमुळे हिसवळ खुर्द , हिसवळ बु. ग्रामस्थांना पावसाळ्यात पिण्यासाठी पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो. अनेक वेळा मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी नांदगाव - मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन केले . ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेतुन सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली . यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ढवळे साहेब, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कापसे साहेब, नांदगावचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरवाडकर , पो. बोगीर , पो. सोनवणे, हिसवळ खुर्द चे सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, सदस्य नानासाहेब आहेर, सुदाम आहेर, बंडूकाका आहेर, लखन आहेर, शांताराम लोखंडे, संदीप कदम, संदीप आहेर, माजी सरपंच विजय आहेर, माझे सरपंच मोहन दादा आहेर, माजी सरपंच संजय बापू आहेर,हिसवळ बु. सरपंच बाळू नाना बेंडके, रवींद्र देशमुख, श्रावण भालेराव, राजेंद्र करवर यासह, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचीही गाडी ग्रामस्थांनी अडवली व आपले संपूर्ण समस्या त्यांच्यासमोर मांडली. यातून अधिकारी लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढण्याचेही आश्वासन बनसोड यांनी ग्रामस्थांना दिले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment