नांदगाव (प्रतिनिधी)- राज्यात झालेल्या सत्ता नाट्य नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक भूमिकेत आले असून बंडखोर झालेल्या मतदारसंघातील शिवसेना आमदार व त्यांच्या समर्थकांची हकालपट्टी करण्याचा धडाका शिवसेनेच्या वतीने लावण्यात आला असून, याच धर्तीवर नांदगाव तालुक्यातील पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून नवीन पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आल्या. यात आमदार सुहास कांदे यांच्या जागेवर जिल्हाप्रमुख म्हणून मनमाडची माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांची वर्णी लागली असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुख पदी अल्ताफ बाबा खान यांच्या खांद्यावर धुरा देण्यात आली आहे. तर नांदगाव तालुका प्रमुख म्हणून संतोष अण्णा गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज या सर्व शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी नांदगाव तालुक्यातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन रॅली केली. आज हा सायंकाळी चार वाजता नवनिर्वाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचे नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा, महात्मा फुले पुतळा, तसेच अहिल्यादेवी चौक अभिवादन करत शिवस्मृती मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅली करण्यात आली. यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख अल्ताफ बाबा खान, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक , तालुकाप्रमुख संतोष अण्णा गुप्ता, नांदगाव तालुक्याचे संपर्कप्रमुख प्रवीण नाईक, मनमाडची माजी नगराध्यक्ष दिलीप सोळशे, शशिकांत मोरे, सुनील पाटील, एडवोकेट सुधाकर मोरे, मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख संतोष अण्णा बळीत, शैलेश सोनवणे ,सनी फसाटे, प्रमोद पाचोरकर, संजय कटारिया, लिकायत शेख, ससमाधान देतकार , प्रदीप सूर्यवंशी, भरत आप्पा मोकळ, राजाभाऊ चिते, संतोष बच्छाव, बाळासाहेब गुंजाळ ,शरद गुजर, दिलीप नंद, न्यानेश्वर पवार, चंदू चव्हाण , नामदेव बोराडे, दत्तू चोळखे आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment