Friday, July 22, 2022

मनमाडमध्ये शिवसंवाद यात्रेतून आदित्य ठाकरे यांचे बंडखोर आमदारांवर टिकास्त्र,

       शिवसैनिकांशी संवाद साधताना                     आदित्य ठाकरे.


मनमाड ( प्रतिनिधी) - मनमाडमध्ये शिवसेनेचा शिवसंवाद यात्रा पार पडली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाषणातून बंडखोर आमदारांवर टिकास्त्र सोडलं. "  गद्दारांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला व त्यांच्या खुर्चीवर बसले. त्यांना उत्तर देण्यासाठी मी आलेलो नाही. ४० गद्दार नजरेला नजर मिळवू शकत नाही. गद्दारांना हिंदुत्वाचा पुळका आताच का आला? सत्तेत होते तेव्हा अडीच वर्ष गप्प का राहीले? पक्षाचा आदेश सर्वोच्च असतो तो तुम्ही का पाळला नाही? त्यामुळे शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाही, असे खडे बोल आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सुनवाले आहेत. मनमाडला आयोजित शिव संवाद यात्रेनिमित्ताने ते बोलत  होते. मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
        राज्यातील सरकार वर  आदित्य ठाकरे यांनी भाष्य  केलं,  आमदार विकले गेले, लिहून घ्या. हे तात्पुरते अल्पमतातील सरकार आहे. मी विकलो गेलो नाही, आमदार विकले गेले. राजकारण घाणेरडे झालं, माणुसकी तोडून राजकारण सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे भेटत नव्हते, असा आरोप केला. पण, दोन गंभीर शस्त्रक्रिया झाल्या म्हणून भेटले नाही, त्यांचं दुःख मी बघितलं. मुलगा म्हणून मी जवळ होतो. आजारी असतांनाही उद्धव ठाकरेंनी काम थांबवले नाही. महाराष्ट्राची सेवा थांबविली नाही. आजारपणाचा फायदा घेत गद्दारांनी आमदार जमविले. ते आमदार विकले गेले, असा टोला बंडखोर आमदारांना लगावला आहे. पुढे होणाऱ्या विधानसभा, लोकसभेत पुन्हा ताकद दाखवा'गद्दार नेते गेले. मात्र, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागावे. पुढे होणाऱ्या विधानसभा, लोकसभेत पुन्हा ताकद दाखवा. तुम्हा शिवसैनिकांना पुन्हा नव्याने संधी उपलब्ध होणार आहे, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. यावेळी नांदगाव तालुक्यातून अनेक शिवसैनिक शिवसंवाद यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

 

      

No comments:

Post a Comment

नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,

नांदगाव ( प्रतिनिधी ) -   नांदगाव येथील   व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी  ...