Tuesday, July 26, 2022

मनमाडच्या सैफ तांबोळीची कॉमनवेल्थ गेम जिम्नास्टिक या प्रकारात भारताच्या संघात निवड, निवडीने सर्वत्र होतोय कौतूक,



मनमाड (प्रतिनिधी)-  इंग्लंड  येथील बर्लिन्गम होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम साठी जिम्नास्टिक या प्रकारात मनमाडच्या सैफ तांबोळी याची निवड झाली असून नुकताच तो इंग्लंडला रवाना झाला आहे. इंग्लंड मधील बर्लिन्गम येथे गुरुवारी २८ तारखेपासून कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. यासाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे या निवडीचे मनमाड शहरासह नाशिक जिल्ह्यातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जिम्नास्टिक या प्रकारात महाराष्ट्राचा पहिला खेळाडू म्हणून सैफची निवड झाली आहे.
          इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम साठी भारतीय संघाचे खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत यात सर्व प्रकारच्या खेळाडूंचा समावेश आहे. जिम्नास्टिक या प्रकारात भारताच्या संघात मनमाडच्या सैफ तांबोळीची निवड करण्यात आली असून तांबोळी हा महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडू आहे .भारतीय नेव्ही मध्ये कार्यरत असलेला सैफ हा जिम्नास्टिक प्रकारात उत्कृष्ट खेळाडू असून भारतीय संघ निवडल्यानंतरही प्रशिक्षकांनी पुन्हा त्याची संघात निवड केली आहे. इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम मध्ये तो भारताचा प्रतिनिधित्व करणार आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील सादिक तांबोळी यांचा सैफ हा मुलगा आहे. लहानपणापासूनच त्याला जिम्नास्टिकची आवड होती या खेळाची आवड बघून तांबोळी यांनी त्याला पुढे मदत केली व याच खेळाच्या जोरावर सुरुवातीला विभाग , राज्य , आंतरराज्य तदनंतर देशपातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याला भारतीय नेव्ही मध्ये नोकरी मिळाली. नोकरी करत असताना त्याने आपला सराव सुरूच ठेवला याचे फळ म्हणून आज तो कॉमनवेल्थ गेम साठी निवड झाली. कॉमनवेल्थ गेम मध्ये मेडल मिळवण्याची आशा त्याच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे. कॉमनवेल्थ गेम मध्ये मेडल मिळाले तर भविष्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी देखील त्याची निवड होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातून इथपर्यंत कामगिरी करणाऱ्या सैफचे सर्वस्तरातुन कौतूक होत आहे.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,

नांदगाव ( प्रतिनिधी ) -   नांदगाव येथील   व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी  ...