निवेदन देताना वंचितचे पदाधिकारी
मनमाड ( प्रतिनिधी) - मनमाड शहरातील गुरुद्वारा ते पाकीजा कॉर्नर येथील सिमेंट काँक्रीटचे रोडचे काम महालक्ष्मी माता मंदिर ते पाकीजा कॉर्नर या अपूर्ण रोडचे काम बरेच दिवसांपासून बंद पडलेले आहे .या रस्त्यावरून रहदारी जास्त प्रमाणात आहे. हा रस्ता पुढे जाऊन अमरधाम कडे जातो. तसेच उपजिल्हा रुग्णालय शाळा बँक इत्यादी ठिकाणाकडे जात असून यावरील रहदारी जास्त प्रमाणात आहे, व याच रस्त्याचे काम रखडलेले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित चालू करण्यात यावे. या रस्त्याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी मनमाड शहर शाखेच्या वतीने तीव्र स्वरूपाच्या आंदोलन घेण्यात येईल, असे निवेदन मुख्याधिकारी मनमाड नगरपरिषद यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष आम्रपालीताई निकम, तसेच शहर सचिव अनवर मंसूरी ,शहर उपाध्यक्ष गणेश भाऊ एलींजे, पी. आर. निळे,अमोल केदारे ,मच्छिंद्र भोसले ,साहेबराव अहिरे, प्रकाश नावकर ,वाल्मीक पाटील, संदीप पवार, निलेश निकम, सागर गाडे, राकेश पगारे ,राकेश शिलावट, रोहित संसारे, सौरव डोळस, सागर केदारे, रोहित कडवे, मनोज गरुड, सुनील अहिरे, बापू अहिरे ,गणेश निकम ,लकी निकम, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment