मनमाड ( प्रतिनिधी) - आज मनमाडमध्ये आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन मनमाड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अफजल शेख यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली दि. १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. शहरातील काँग्रेस भवन येथून पदयात्रेची सुरवात मोठ्या दिमाखात करण्यात आली. भारत माता कि जय, वंदे मातरम, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांनी पदयात्रा जाऊन मालेगाव रोड येथे पदयात्रेचा समारोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळेस उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. या पदयात्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष अफजल शेख, रमेशभाऊ कहांडोळे, सुभाष नहार, भीमराव जेजुरे, ऍड. शशिकांत व्यवहारे, मा. नगरसेवक संजय निकम, नाजीम शेख, कॉ. रहमान शाह, अशोककाका व्यवहारे, प्रेमराज बेदमुथा, पारसशेठ बरडिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपकभाऊ गोगड, मा. नगराध्यक्ष बबलू पाटील, नाना शिंदे, हबीब शेख, अमोल बोथरा,अक्षय देशमुख, कोमल निकाळे, दिपा कोरडे, फकीराशेठ शिवदे,ऍड. पाटील, अनिल देवरे, बाळासाहेब साळुंके, ऍड. वाल्मिक जगताप, अन्सार शाह, जाहिद शेख,अजीज पठाण, इलियास पठाण, सईद दादा, हिरामण कुसमाडे, संसारे, ऍड. फरीदा मिठाईवाला, मुमताज आपा, फातेमा आपा,समिना आपा,राहत फौंडेशनचे कयाम सैय्यद, सोहेल जाफरी, आबिद शेख, हुजेफा खान, रिजवान कुरेशी, फुले, शाहू, आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे अध्यक्ष बेग चाचा, कार्याध्यक्ष फिरोज शेख, मुश्ताक सर, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे भीमराज लोखंडे,रमेश आव्हाड, विष्णू चव्हाण, गायकवाड गुरुजी यासह प्रमुख पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment