Saturday, August 13, 2022

मांडवडच्या जनता विद्यालयात अमृत महोत्सवा निमित्त "हर घर तिरंगा " अभियान जनजागृतीसाठी राष्ट्रीय ध्वजारोहण व रॅली





मांडवड (प्रतिनिधी) -   मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील  जनता विद्यालय मांडवडमध्ये  भारतीय स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत" हर घर तिरंगा " हे अभियान राबविले जात आहे त्या निमित्ताने जनता विद्यालय  मांडवड मध्ये राष्ट्रीय ध्वजाचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे एस.  एस. यांच्या हस्ते तर शालेय पंतप्रधान कु. वैष्णवी पिंगळे हिच्या हस्ते  ध्वजारोहन   करण्यात आले. शालेय गीत मंचाने राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीत सादर केले.
 विद्यालयाच्या प्रांगणापासून मांडवड गावात जनजागृती बाबत रॅली काढण्यात आली या रॅलीचे उद्घाटन  शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे एस. एस. यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री आहेर एस. जे. यांनी केले. तसेच विद्यालयाच्या 
मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे एस. एस. यांनी आपल्या मनोगतात   भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना व क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण व्हावे व हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभाग व्हावे असे आवाहन केले. या वेळी विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा समूह गायन स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा  विविध स्पर्धां घेण्यात आल्या होत्या. सकाळी   ८.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभागी होऊन तिरंगी ध्वज, घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन ढोल ताश्यांच्या गजरात घोषणा देत गावातील विविध  चौकात " हर घर तिरंगा " याबाबत जनजागृती करण्यात आली.
 क्रीडा शिक्षक श्री. आहेर एस. जे. व सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच कला, क्रीडा,सांस्कृतिक समितीतील सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व  शिक्षक शिक्षकेतर सेवक  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....