Sunday, August 14, 2022

नांदगावात मदरशांच्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी, राष्ट्रप्रेमाचा दिला संदेश,



नांदगाव (प्रतिनिधी) -    आज संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना, नांदगाव शहरातही जामा मस्जिद ट्रस्ट संचालित मकतब फलाहुल मुस्लीम मदरशाच्या शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज मिरवत "दिल दिया हैं जान भी देंगे ए वतन तेरे लिये" या गाण्यावर ताल धरत प्रभात फेरी काढली. प्रभात फेरीचे आयोजन मुफ्ती फहीम, रियाज पठाण सर आणि रहेनुमा फाउंडेशनचे आयाज भाई यांनी केले. धार्मिक शिक्षण घेत असताना या विद्यार्थ्यांना आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा, राष्ट्रहिताचा, आणि प्रत्येकाने आपण भारतीय आहोत याचा अभिमान बाळगावा, देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक स्वतंत्र सेनानीनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मुस्लीम समाजाच्या अनेक उलमा (मौलाना) निही बलिदान दिलेले आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून आपण ज्या धर्माचे आचरण करतो त्यांच्या धर्मगुरूंनी देशहितासाठी आपले सर्वस्वी बलिदान केले. अशा उलेमांच्या नावाचे बॅनर हातात घेवून त्यांना एकप्रकारे श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालकांनीही प्रभात फेरीत सामील होऊन प्रोत्साहन दिले. नांदगाव शहरात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांनी आपल्या शरही लिबास (गणवेशात)मध्ये मदरशांच्या विद्यार्थ्याना प्रभातफेरी काढल्याने सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरला. प्रभातफेरी यशस्वी करण्यासाठी  मुस्लीम तरुणांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. हाजी मुनव्वर, साजीद तांबोळी, लाला चाचा, न्याजू उस्ताद, सलमान पठाण, जावेद कुरैशी, खलील जनाब, मकतबचे माजी विद्यार्थ्यांनी व सर्वच मौलानानी  मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...