नांदगाव ( प्रतिनिधी) - अन्याय आत्याचार समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नांदगावच्या सारनाथ बौद्ध विहार, औरंगाबाद रोड ईथे अपघात विमा शिबीर पार पडला. यात भव्य पोस्ट खाते यांचा ३९९ रुपयात अपघात विमा शिबीर रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख राजु गांगुर्डे यांच्या नियोजनाने आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या उद्घघाटना साठी माजी नगरसेवक अनिल जाधव, नितीन जाधव, पोस्ट अॉफिसचे दिलीप पवार , पोस्ट मास्तर भगवान सेठ (जामदरी), भाजपचे नेते उमेश उगले, सखाराम चव्हाण, डी.एन कटारे , प्रकाश भाऊ निकम, वंचित बहुजन आघाडीचे नेते अविनाश केदारे , मिनाक्षी झोडगे, समिती तालुका संपर्क प्रमुख मनिषा गांगुर्डे, सुरेखा ढाके, शिला सांगळे, ज्योती ठाकूर, रोहिणी व्हडगळ (मनमाड) , शुभांगी देवरे, गौरी कुलकर्णी, चेतना परमार्थ, पोस्ट ऑफिस कर्मचारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महामानवाच्या प्रतिमीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी प्रास्तासाविक तालुका प्रमुख राजु गांगुर्डे यांनी केले की, समिती ही संपुर्ण महाराष्ट्र मध्ये आहे व राज्या बाहेर ही आहे. नोंदणीकृत असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत असते. एक लाख पेक्षा जास्त नोंदणी झाली आहे आज पोस्ट विमा हा सर्वांना न्यायक आहे . सर्व धर्मिंयासाठी खुला आहे याचा लाभ घ्यावा असे म्हटले आहे. प्रमुख पाहुणे नितिन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत पवार यांनी केले व यासाठी किरण गवळे , तालुका सचिव वसंत मोरे , तालुका संघटक बबलू गवळे, विकी मराठे, किरण फुलारे, बापू खरे, गणपत मुकणे, पिंटू मेंगल ठाकरवादी , यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व मान्यवरांचे अन्याय अत्याचार निर्मलुन समिती तालुका प्रमुख राजु गांगुर्डे तर्फे खुप खुप आभार व्यक्त करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment