ग्रांमपंचायत निवडणूकीत निवडून आलेले सदस्य विक्टरी साईन दाखवताना
नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील ग्रांमपचायत निवडणूकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात सहा ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर
असलेल्या मात्र मुदत संपल्यामुळे व वर्षभरापासून प्रशासकीय राजवट असलेल्या सहा ग्रामपंचायतीत आता लोकप्रतिनिधींचा कारभार पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला, असला तरी मल्हारवाडी, क्रांतीनगर, फुलेनगर, श्रीरामनगर, गिरणानगर, हिंगणवाडी या सर्व ठिकाणी यापुढे पाच वर्षासाठी महिलाराज दिसणार आहे. निवडणूक झाल्याने उर्वरित पाच ठिकाणी गुरुवारी (ता. ४) ७८ टक्के मतदान झाले. त्याची शुक्रवारी मतमोजणी झाली. विजयी उमेदवारांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय असून, याशिवाय सरपंच पद पाच वर्षासाठी महिलांसाठी आरक्षित झाले आहे. सहाही ग्रामपंचायतीत ३३ महिला निवडून आल्या आहेत.
विजयी उमेदवार पुढीरप्रमाणे : १) गिरणानगर ग्रामपंचायतीत प्रभाग एकमधून प्रमिला अहिरे (१००), प्रभाग दोनमधून अनिल आहेर (३१२), कोमल आहेर (२८४), पल्लवी सोमासे (२५८), प्रभाग तीनमधून सुनंदा सोनवणे (१३६), सुनील सोनवणे (१२०), प्रभाग चारमधून अॅड. उमेशकुमार सरोदे (१२१), वैशाली कुटे (१६९) निवडून आले. याच ग्रामपंचातीच्या प्रभाग एकमधून योगेश दळवी, अनिता पवार तीनमधून, तर सुमन ठाकरे प्रभाग चारमधून यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
२) मल्हारवाडी ग्रामपंचायतीमध्ये :-
प्रभाग एकमधून मिना भागिनाथ (२०९), शोभा पिठे (१५८), सरला काकळीज (१७४), दोनमधून सारिका जेजुरकर (२६४), अश्विनी खैरनार (२६२), सुनंदा झेंडे (२२६), तीनमधून दीपक खैरनार (२६७), चित्रा इघे (२१९ ) विजयी झाले. प्रभाग तीनमधून राहुल पवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
३) हिंगणवाडी :- येथील प्रभाग एकमधून अनुसया गायकवाड (१७९), मनोहर खंबायत (१७९), जन्याबाई शिंदे श्रीरामनगर येथे बिनविरोध (१८८), प्रभाग दोनमधून कांताबाई खंबायत (१००), संभाजी बच्छाव (९६), तीनमधून रामभाऊ बागूल (१२४) विजयी झाले. मनीषा डोळे यापूर्वीच तीनमधून बिनविरोध विजयी झाले आहेत.
४)क्रांतीनगर :- येथे प्रभाग दोनमधून प्रियंका पाटील (२०१), बेबीताई पाटील (२१२), तीनमधून सचिन मोकळ ( १९५), पूनम जेजूरकर (२२८), मंगल मोकळ (२१५) हे उमेदवार विजयी झाले. यापूर्वी संगीता नरोटे, कडूबाई काळे व इंदुबाई गायकवाड प्रभाग एक, तर युवराज डोळे प्रभाग दोनमधून बिनविरोध निवडून आले आहेत.
५)फुलेनगर :- येथे प्रभाग एकमधून शितल जगधने (१५५), रामदास जगधने (१३८) विजयी झाले. प्रभाग एक व तीनमधीलजागा रिक्त राहिल्या आहेत. हिराबाई माळी व मिना माळी प्रभाग दोन, तर प्रभाग तीनमधून उषाबाई पाटील यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.
६)श्रीरामनगर :- यात सर्व सातही सदस्य हे बिनविरोध निवडून आलेले आहे . प्रभाग १ मधून गायकवाड अर्चना सुभाष , महाजन शुभांगी विजय , महाजन शुभम सुनील, प्रभाग २ मधून राऊत कमलाबाई सुधाकर, राऊत सागर वाल्मिक, प्रभाग ३ मधून खैरणार नंदा बाळासाहेब , निकम अतुल विष्णु .
No comments:
Post a Comment