Monday, August 22, 2022

नांदगाव नगरपरिषद शहरात मोकाट जनावरे दिसली तर कडक कारवाई करणार ,


नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरात मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ठिय्या मांडून बसत असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.  मुक्या प्राण्यांमुळे शहरात नागरिकांना पायी रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. दिवसभर रस्त्यावरील पादचारी, वाहनधारक यांची कोंडी होत असताना मध्येच होते. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नगर परिषदेने पशुधारकांनी आपल्या मालकीच्या जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा परिषद कडक कारवाई करेल, अशी जाहीर सूचना रिक्षावर लावलेल्या ध्वनिक्षेपकावरून देण्यात येत आहे.
   मालक बिनधास्त जनावरे गावात सोडून देतात व गायीला वासरू झाले की मगच घेऊन येतात दुधाला. अन्यथा ही जनावरे मोकाटच असतात. या भटक्या जनावरांची ठरावीक ठिकाणे आहेत. ती घरे व दुकाने बिनधस्त ते टिपतात. तेथे त्यांना घास, गूळ, दाळ मिळते किवा रात्रीची उरलेली भाजी-भाकर, चपाती मिळते.
एखादा वळू बेकाबू झाला की पळापळ मालक
आहेत. तर पायी चालणारे त्रस्त झाले आहेत. त्यांच्या शेणामुताच्या वासाने नागरिक वैतागले आहेत. अनेकदा नगर परिषद, शाकांबरीचा पूल, शनिमंदिर पेट्रोलपंपासमोर, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, ओटे, बाजारपेठ आदी ठिकाणी ठिय्या मांडून बसतात. नगरपरिषदेने रस्त्यावरील मोकाट जनावरे हटविण्याची मोहीम हाती घेतली असून या मोहिमेला यश मिळो, अशी सदिच्छा नागरिक व्यक्त करत आहेत. मागच्या महिन्यात विश्वासराव कवडे यांच्या शेतातील मक्याचे उभे पीक या मोकाट जनावरांनी फस्त केले.
तीन दिवसांत मोकाट जनावरे ज्याची असतील त्यांनी घेऊन जा अन्यथा कोंडवाड्यात किंवा गोशाळेत दाखल केली जातील याची सर्वस्वी जबाबदारी मोकाट जनावरांच्या मालकाची राहील, असे नगर परिषदेने कळवले आहे.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....