Thursday, September 15, 2022

मालेगांव - नांदगाव बससेवेत असलेल्या त्रुटी तात्काळ दुर करा , नांदगाव व्यापारी संघटनेची बस आगार व्यवस्थापकांना निवेदन,


  नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील  व्यापारी संघटनेने  नांदगाव बस आगार व्यवस्थापकांना निवेदन केले आहे की, मालेगांव येथून सायंकाळी ७ वाजेनंतर नांदगाव शहरात येण्यासाठी बससेवा उपलब्ध नसल्याने, व्यापारी, दैनंदिन प्रवाशी आदींची अतोनात गैरसोय होत आहे. सात वाजेनंतर अशा प्रवाशांना मनमाड मार्गे नांदगाव येण्याची वेळ आगार प्रशासनाने आणलेली आहे. ही बाब मोठी खर्चिक व अन्याय कारक आहे. यांमुळे बस प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे.  कोविड च्या स्थितीत बससेवा कमी होणे स्वाभाविक होते. परंतू आता पुर्ववत रात्री ७.३० व ८.४५ या वेळेत सुरू असणारी मालेगांव नांदगांव बससेवा विना विलंब दसरा दिवाळी पुर्वीच पूर्ववत न झाल्यास २ ऑक्टोंबरला २०२२ रोजी बस स्थानकासमोर "रास्ता रोको" आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने दखल घ्यावी व तात्काळ बससेवा पुर्ववत करावे अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली. कोविड १९ च्या आपत्तीनंतर नांदगाव आगाराने किती बससेवा पुर्ववत केल्या व किती बससेवा अजुनही बंद आहेत याची माहिती द्यावी  अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. निवेदनावर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश  कळंत्री, सेक्रेटरी विजय चोपडा,  उपाध्यक्ष बाळासाहेब  कवडे उपाध्यक्ष प्रदीप सिसोदिया यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

No comments:

Post a Comment

नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड,

नांदगाव (प्रतिनिधी ) - येथील नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभ...