नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव पोलिस ठाण्यात बेकायदेशीर वाळू वाहतुकीसाठी जमा केलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून 'हॅश व्हॅल्यू' मार्गाचा अवलंब करून पकडले. दोन वेळेस सापळा रचला. मात्र, दोन्ही वेळेस प्रत्यक्ष देवाणघेवाण झाली नाही. मात्र, 'हॅश व्हॅल्यू'चा उपयोग करून गुन्हा नोंदविण्यात आला. हवालदार सुरेश सांगळे (वय ५४), पोलिस शिपाई अभिजित उगलमुगले( वय २९ )यांच्यावर कारवाई करण्यात आली. २७ जुलैला लाचेची मागणी पंचासमक्ष केली होती. उगलमुगले यांनी सांगळे यांना लाच मागणीसाठी प्रोत्साहन दिले, म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, पोलिस नाईक प्रभाकर गवळी, वैभव देशमुख, संतोष गांगुर्डे यांनी ही कारवाई केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment