Thursday, September 15, 2022

भुसावळ - देवळाली मेमु एक्स्प्रेस धावणार,

     पॅसेंजर गाडी आता भुसावळ- देवळाली मेमु एक्स्प्रेस 

नांदगाव/ मनमाड (प्रतिनिधी) -  कोवीडमुळे पॅसेंजर  गाडी गेल्या अडीच वर्षांपासून बंद असल्याने भुसावळ- देवळाली  ये-जा करणा-या या रहिवाशांची मोठी गैरसोय होत होती. ही गाडी आता नवीन नंबरसह सुरु होत आहे. तीच्या वेळेतही बदल करण्यात आलेला आहे. मात्र, ही गाडी पॅसेंजर ऐवजी मेल एक्सप्रेस असून भाडेही जास्त असेल. गाडीला बारा डबे असून त्यातील दहा जनरलचे आणि दोन ब्रेक व्हॅन आहेत. गाडी क्रमांक 11114 अप भुसावळ- देवळाली ही भुसावळहून येत्या 16 सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता नियमीत सुटेल.तर गाडी क्रमांक 11113 डाऊन देवळाली-भुसावळ पॅसेंजर ही देवळालीहून 17 सप्टेंबरला सकाळी 7:20 वाजता नियमित सुटेल.या गाडीची देवळालीहून सुटण्याची वेळ पहाटे पाच एवजी 7.20 अशी आहे. त्यामुळे नाशिक ते नांदगाव दरम्यानच्या नोकरदार, व्यावसायिक आदींची सोय झाली आहे. नांदगाव च्या आम्ही नांदगावकर यांनी अनेक निवेदने, मागण्या केल्या तरी रेल्वे प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर आलेले नाही. नांदगाव करांच्या सेवेत जर गाड्या वाढल्या तर त्यांचा प्रवास सुखदायी होईल.  प्रवाशांची  गैरसोय यामुळे होणार नाही. कोरोनापूर्वी ही पॅसेंजर पहाटे पाचला देवळालीहून सुटत होती. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना भुसावळला दुपारी बाराच्या आत पोहचता येत असे. नवीन मेमूला जादा भाडे व नवीन वेळेमुळे असल्याने प्रवास करावा लागणार आहे.ही गाडी मेमू एक्स्प्रेस मनमाड जंक्शन, पानेवाडी, नांदगाव, न्यायडोंगरी इथे थांबणार आहे. गाडीचे वेळापत्रक असं देवळाली - भुसावळ गाडी. (११११३)  - मनमाड सकाळी - ८.३०, पानेवाडी- ८:४४, नांदगाव -९.०३, न्यायडोंगरी-९:१९ वाजता तर गाडी.११११४ भुसावळ - देवळाली कडे - न्यायडोंगरी- रात्री ७:५९, नांदगाव-८:१८, पानेवाडी-८:३४, मनमाड जंक्शन- ८:५० असेल.

No comments:

Post a Comment

नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड,

नांदगाव (प्रतिनिधी ) - येथील नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभ...