नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव भूमीचे सुपुत्र दाऊद शेख यांच्या विशेष प्रयत्नातून शहरातील अल्पसंख्याक वस्ती गुलजार वाडीत मुस्लीम समाजाच्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना तसेच माता भगिनींना काही व्यावसायिक कला कौशल्य शिवण मशिन, मेहंदी क्लास सुरू केलं होतं. क्लासचा उद्देश असा होता त्यांना आपल्या पायावर उभे राहता येईल आत्म सन्मानाने जगता येईल याचं भावनेने दाऊद भाईंनी आपल्या खिशातून पैसे लावून या समाजाला आपण काही देणे लागतो हीच भावना मनात ठेवून आपल्या स्वताच्या नावाला मागे ठेउन आपण ज्यांना आदर्श मानतो असे दिवंगत इकबाल दादा शेख यांच्या नावाने जेणे करून त्यांच्या आत्म्यास ही पुण्य लाभेल या पवित्र हेतूने दिवंगत इकबाल दादा शेख या नावाने कोचिंग क्लासेस अंतर्गत शिवण क्लास व मेहंदी क्लासचे अत्यंत यशस्वीरित्या चालवून आज प्रशिक्षण पूर्ण झाले. ज्यांनी कोर्स पूर्ण केलं चेहऱ्यावर हास्य दिसुन येत होते. यात जवळ पास १०० माता भगिनींना शिवण क्लास व मेहंदी क्लासचे प्रमाणपत्राचे वाटप करून सांगता केली. समाजातील अनेक मान्यवरांनी दाऊद शेख यांच्या भावना समजून त्यांना साथ दिली. कार्यक्रमाचे आयोजन याकुब शेख अध्यक्षतेखाली तसेच महिला जिल्हा मुस्लीम उत्कर्ष समिती अध्यक्षा फरिदा काझी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दाऊद शेख यांचे मित्र मोहसीन खाटीक,शरीफ शेख , शाकीर पठाण, सफर भाई, बाबा भाई,जकी शेख, आवेस पठाण, सबदर भाई, फज्जू भाई, रफिक भाई, वसीम शेख इत्यादींनी प्रयत्न केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड,
नांदगाव (प्रतिनिधी ) - येथील नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभ...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment