न्यायडोंगरी(प्रतिनिधी)- नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी इथं भूषण बत्ताशे यांच्या घराचं काम चालू असताना भूषण यांना पाण्याची टाकी मध्ये आवाज आला त्यांनी टॉर्च लावून बघितलं तर भला मोठा कोब्रा जातीचा विषारी साप आढळला होता. दुसऱ्या टाकीत पांढऱ्या टिपके असलेला साप दिसला. भूषण त्यांचे मित्र अनिल गायके यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला आणि घडलेला प्रकार सांगितला बडोदे तात्काळ न्यायडोंगरी ला घटनास्थळी पोहोचले . पाण्याच्या टाकी मध्ये पाच फूट कोब्रा जातीच विषारी साप , त्याच्या खाली पाण्यात घोरपड दिसली. दुसऱ्या टाकीत तस्कर जातीचा बिनविषारी साप होता एक एक करून व्यवस्थित बाहेर काढले व बरणीत बंद केले . भूषण बत्ताशे परिवाराला भयमुक्त केल्याबद्दल सर्पमित्र विजय बडोदे यांच्या कार्याला शुभेच्या दिल्या आणि कोब्रा , तस्कर, घोरपड वनविभागात नोंद करून निसर्गसानिध्यात स्वाधीन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment