नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव ते भालुर मार्गावरील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करणे व बसचा वेळ बदलणे बाबत आज युवासेनेतर्फे डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की युवासेना शाखा भालुर तर्फे आपणास निवेदन देतो कोविड १९ लॉकडाऊन मध्ये १:३० वाजता नांदगाव ते भालुर बस चालू होती ती बंद झाली होती. पण लॉकडाऊन उघडुन खूप दिवस झाले आहे पण बस सेवा अजून सुरू झालेली नाही त्यामुळे नांदगाव ते भालुर मार्गावरील सर्वच नांदगाव कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होतेय व दुपारी ३ वाजता जी बस आहे तिचा वेळ नांदगाव वरून ४ वाजता करावा कारण काही विद्यार्थ्यांचे कॉलेज ३ ला सुटते त्यामुळे त्यांना ती बस मिळत नाही . त्यामुळे त्यांना इतर वाहनांच्या साह्याने यावे लागते मुलींना कधी कधी ५-६ किमी पायी यावे लागते तरी आपण आम्हाला सहकार्य करावे. ह्या पैकी भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्या कडे निवेदन हि दिले होते पण त्याची दखल घेतली गेली नाही. तरी आम्ही आपणास कळकळीची विनंती करतो की आपण आमच्या निवेदनाची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी, असे निवेदन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख संतोष गुप्ता, युवासेना भालुर तर्फे आदेश शिंदे व सौरभ निकम उपस्थित होते. त्यासोबत विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी चे पत्र होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment