Wednesday, September 21, 2022

नांदगाव हे स्मार्ट सिटी होणार - डॉ . ओमप्रकाश कुलकर्णी,

डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांचा सत्कार करतांना आमदार सुहास कांदे, विजय चोपडा, बाळासाहेब कवडे, सुनील चांडक, दिलीप पारख, रत्नाकर खरोटे, आनंद कासलीवाल .


  नांदगाव ( प्रतिनिधी ) -  सततच्या औद्योगिक व व्यावसायिक दृष्ट्या मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदगाव तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय संशोधक डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने पुढे जाण्याचा निर्णय नांदगाव येथील बैठकीत घेण्यात आला. येथील विश्रामगृहात आ. कांदे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील उद्योजक, व्यावसायिक व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठकीचे आयोजन उद्योगवर्धिनी नाशिकचे संचालक सुनील चांडक यांनी केले होते. 
   यावेळी भौगोलिक, औद्योगिक व पारंपारिक शेती इत्यादी परिस्थितीचा अभ्यास करून नांदगाव तालुक्याच्या दृष्टीने छोट्यात छोट्या गटापासून सर्वांना रोजगार व व्यवसायाची संधी कशी प्राप्त होईल याचा विचार व अभ्यास करून आपल्याला व्यवसाय संधी उपलब्ध करून देता येतील.  याचवेळी नांदगाव तालुका शेती प्रधान असल्याने शेतीवर आधारित आधुनिक पिक पद्धती व त्या अनुषंगाने आवश्यक बदल कसे करता येतील याचा विचार आपणास करावा लागेल.  त्यासाठी मी माझ्या स्तरावरून डॉ कुलकर्णी यांना सर्वतोपरी सहाय्य व मदत करण्यास तयार आहे असे प्रतिपादन आ. कांदे यांनी केले. 
    नांदगाव माझी जन्मभूमी असून तिच्यासाठी आपण काही तरी करावे व या भावनेतूनच मी आज नांदगाव येथे आलो आहे असे भाव विवेशतेने मत मांडले आहे.  डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले कि, माझ्या अभ्यासाचा संशोधन वृत्तीचा फायदा मी माझ्या नांदगावला देण्यासाठी सदैव तयार आहे. नांदगाव हे स्मार्ट सिटी करण्याचा आराखडा तयार असून तो मी नांदगावला देण्यास व त्यासाठी काम करण्यास हि तयार आहे. असे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले. 
  आमच्याकडे बचत गटाच्या एकूण ३००० पेक्षाही अधिक महिलांचे बचत गट कार्यरत असून त्यांच्यासाठी काही तरी करण्याची आपली व सौ. अंजुम कांदे यांची ईच्छा असून डॉ. कुलकर्णी व उद्योगव्र्धीनीचे चांडक यांच्या संयुक्त उपस्थितीत लवकरच नांदगाव येथे एक भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन करून त्यात बचत गटाला व्यावसायिक संधी देऊन त्यांच्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेऊ असे आ. कांदे यावेळी म्हणाले होते.
     डॉ. कुलकर्णी यांनी कमी खर्चाचे व्यावसायिक तंत्रज्ञान द्यावे व उद्योग व्र्धीनीचे सुनील चांडक यांनी उत्पादनाचे मार्केटिंग यशस्वीरीत्या करून द्यावे अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी व्यापारी संघटनेचे विजय चोपडा, उद्योजक आनंद कासलीवाल व मुकुंद शहा, कृषी तज्ञ बाळासाहेब कवडे, दिलीप पारख, रत्नाकर खरोटे, विधिज्ञ सचिन साळवे आदी मान्यवरांनी उपस्थिती होती.  डॉ. कुलकर्णी आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे संशोधक असून त्यांनी अमेरिकेची जनरल इलेक्ट्रिक मोटर, योर्क (वातानुकुलीत यंत्र बनवणारी) कंपनी, भारतीय आर्मी व नेव्ही, इस्रो अशा अनेक ठिकाणी मोलाचे काम केले आहे.   

No comments:

Post a Comment

नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड,

नांदगाव (प्रतिनिधी ) - येथील नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभ...