Saturday, November 19, 2022

नांदगाव च्या इंद्रायणी नगर येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती उत्साहात साजरी,


 
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव च्या शहरातील इंद्रायणी नगर (चांडक प्लॉट) येथे शनिवारी दि. १९ ला  झाशीची राणी लक्ष्मीबाई महिला मंडळाच्या वतीने त्यांची जयंती परिसरातील महिला मंडळाच्या व जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत राम मंदिर येथे साजरी करण्यात आली. 
सविस्तर वृत्त असे की झाशीची राणी लक्ष्मीबाई महिला मंडळाच्या वतीने परीसरात थोर समाज सुधारक व विचारवंत यांच्या जयंती,सार्वजनिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात आणि ते अन्याय विरोधात दंड ही पुकारत असतात प्रत्येक क्षेत्रात हे महिला मंडळ पुढाकार घेत असतात. आज राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी परिसरातील जेष्ठ नागरिकांना आमंत्रीत करुन या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन जेष्ठ नागरिक एकनाथ आहेर तसेच विश्वनाथ शेरेकर यांनी केले तर जेष्ठ नागरिक कचेश्वर गीते आणि शिवाजी जाधव यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच महिला मंडळाचे अध्यक्ष जानवी शर्मा यांनी ही पुष्प हार अर्पण केला.
उपस्थित मान्यवरांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले कचेश्वर गिते यांनी झाशीच्या राणी यांनी अतिशय कठीण संघर्ष केला तर प्रत्येक संघर्षाला मात देत विजय प्राप्त केला तुम्ही ही संघर्ष केला तर विजय निश्चित असेल आम्ही ही सोबत आहोत असे त्यांनी त्यांच्या भाषणातून संबोधित केले त्यांच प्रमाणे रिपाइंचे महावीर जाधव यांनी आपल्या भाषणातून थोडक्यात त्यांचा जीवनपट सांगत राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई १९नोव्हेंबर १८३५ ते जून १७/१८५८..या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ. स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या.सर्वांनी संघटित राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रत्येक संघटनाला झाशीच्या राणी प्रमाणे आपण सर्व मिळून संघर्षावर मात करूया महिला मंडळाच्या अध्यक्ष 
जान्हवी शर्मा यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन आम्ही हा संघर्ष हाती घेऊन यशस्वीपणे संघर्षावर मात करत मार्ग काढण्यासाठी सदैव तत्पर आहोत तरी आम्हाला वरीष्ठ ,जेष्ठ परिसरातील नागरिकांनी तरुणांनी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहुन साथ द्यावी अशी अपेक्षा त्यांनी परिसरातील जमलेल्या जनते समोर मांडत व्यक्त केली आहे. या कार्यक्रमास जेष्ठ महिला शेरेकर आजी,मांडे आजी,गिते आजी,शेरेकर आजी, उपस्थितीत होते महिला मंडळाच्या पदाधिकारी कविता आहेर,मयूरा फोफलिया,शिल्पा महाजन, राखी जाधव,ज्योति क़ाळे,मंदा कुमावत,मंदा चव्हाण यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले होते तर सूत्रसंचालन जयश्री इपर यांनी केले तर आभार शितल मांडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....