नांदगाव शहर ( प्रतिनिधी) - शिव तांडव स्तोत्राचे सामुहिक पठण शहरातील प्राचीन नांदेश्वर महादेव मंदिर परिसरात १०८ विद्यार्थ्यांनी केले. नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक संचालित व्ही.जे.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालासुरात सामुहिक स्तोत्र पठणाचा उपक्रम घेतला. महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येचे औचित्य साधून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.मृण्मयी दंडगव्हाळ व समिक्षा देसले या विद्यार्थिनींनी कथक नृत्याव्दारा तांडव नृत्य सादर केले.सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक चंद्रकांत दाभाडे व अविनाश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.संकुल प्रमुख संजीव धामणे, मुख्याध्यापक मनोहर बडगुजर, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे, पर्यवेक्षक मनोहर शिंदे यांनी सर्व सहभागी विद्यार्थांचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment