Thursday, February 16, 2023

राजापुरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेध करत राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारवरील हल्ले प्रकरणी कठोर कारवाई करावी, नांदगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पोलिस उपविभागीय व तहसीलदार यांना निवदेनाद्वारे मागणी,




 नांदगाव (प्रतिनिधी ) - सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जात आहे. पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे,पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. पत्रकारांवर जीव घेणे हल्ले सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे. ही चिंतेची बाब आहे यास आळा घालण्यासाठी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि संलग्न नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस उपविभागीय अधिकारी समरसिंग साळवे व तहसिलदार डॉ सिद्धार्थकुमार मोरे यांना निवेदन देण्यात आले.
   राजापूर चे युवा पत्रकार शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे. या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. तसेच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या घटल्याची सुनावणी फास्टट्रैक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी संघटनेच्या वतीने मागणी केली असून. राज्यातील पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबत नाही. राज्यात गेल्या आठ दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना घडल्या आहेत. हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावातसेच राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे त्यादृष्टीनं भविष्यात प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली आहे. या वेळी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा
समन्वयक संजीव निकम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बब्बू भाई शेख नांदगाव मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सुरेश शेळके, जेष्ठ पत्रकार संजीव धामणे माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब कदम सरचिटणीस आमिन नवाब शेख, उपाध्यक्ष चंद्रकांत भालेराव, सुहास पुतांबेकर, मोहम्मद शेख, महेश पेवाल, अनिल धामने ,परवेज शेख,भगवान हिरे, किरण डोंगरे, भारत देवरे, गणेश आहेर आदी पत्रकार हजर होते.

No comments:

Post a Comment

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...