: नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील विविध समाजपयोगी उपक्रमाची तसेच समाजेसेवेची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा २०२३- २४ योजनेसाठी नांदगाव नगर परिषदेच्या वतीने ( “ब्रँड अँम्बेसिडर " ) म्हणून समाजसेविका संगिता सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपासक व सेवेकरी संगीता सोनवणे यांच्या निवडीने सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
त्यांनी नांदगाव नगरपरिषद परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले असून, यापूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, विविध सामाजिक संस्थांतर्फे समाजभूषण व अभिमान महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता नांदगाव नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ आणि वसुंधरा अभियान अंतर्गत संदेश/पर्यावरणाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजसेविका संगिता सोनवणे यांनी सांगितले की, " शहरातील स्वच्छतेत तसेच पर्यावरण जागृतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
No comments:
Post a Comment