नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव मध्ये शनिवारी दि. ०४ रोजी सुतार समाज्याचे आराध्य दैवत प्रभु श्री विश्वकर्मा महाराज जयंती उत्सव सालाबादाप्रमाने हनुमाननगर येथील श्री विश्वकर्मा महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी १०ः०० वाजता श्री विश्वकर्मा महाराज मुर्तीची विधिवित पुजा व सत्यनाराण महापुजा भारत शेलार व राणी शेलार यांनी सपत्नीक केली तर महाआरती विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेचे पदाधिकारी यांनी सपत्नीक यांनी केली.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे भाजपा माजी तालुकाध्य दत्तराज छाजेड,चंद्रशेखर कवडे,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता,जेष्ट पत्रकार सुरेश शेळके,संजय मोरे,अँँड सचिन साळवे,शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील जाधव,सर्जेराव पाटील, नंदू पाटील,बाळासाहेब खैरणार आदी उपस्थित होते.
जयंतीनिमित्त समाज बांधवांना जेष्टे नेते बापुसाहेब कवडे,आमदार सुहास कांदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे यांनी शुभेच्छा दिल्या..या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथींचा सत्कार विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेच्या वतीने करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख अतिथी दत्तराज छाजेड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की श्री विश्वकर्मा भगवान हे सर्व समाज्याचे दैवत आहे तालुक्यात सुतार समाज्याचे संघटन असून याचे फलित नांदगाव शहरात प्रभू विश्वकर्मा भगवान चे भव्य मंदिर उभारले असून या बरोबरच इतर कामे जोमात सुरू आहे. आमदार सुहास कांदे यांनी मंदीर परिसरात सभामंडपसाठी निधी दिला त्याबद्दल समाज्याच्या वतीने आभार मानले.श्री विश्व कर्मा सुतार समाज विकास संस्थेचे अध्यक्ष संजय कदम यांनी नांदगाव तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दत्तराज छाजेड यांनी सत्कार केला. यावेळी उपस्थित महिलानी हळदी कुंकवाच कार्यकम झाला.उपस्थिताना विश्वकर्मा युवा मंडाळा तर्फ महाप्रसाद वाटप करण्यात आला.या प्रसंगी विश्वकर्मा सुतार समाज विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय कदम उपाध्याक्ष प्रा.वात्मिक जाधव,सचिव बाबासाहेब कदम खजिनदार दिपक मोरे संचालक नंदुलाल अहिरे,सुभाष पेंढारकर,मधुकर खैरनार,राजेंद खैरनार,दिगबर गवळे,दयाराम सूर्यवंशी,बापु जाधव, अशोक कदम सोपान कदम,बाळासाहेब जाधव, सुनील शेलार ,संतोष जाधव,विश्वकर्मा युवा मंडळाचे किरण हिरे,जयवंत पेंढारकर चंद्रकांत गवळे,नरेंद्र सूर्यवंशी,सौरभ मोरे,समाधान कदम,लखन ठाकरे,स्वप्नील खैरनार,समाधान खैरनार, मयूर कदम,महिला संगिता कदम,सुलोचना खैरनार,उषा पेंढारकर,सुंनदा आहिरे,मनिषा कदम,विद्या कदम,पुष्पा मोरे,निता जाधव,दिपाली आहिरे,सोनाली जाधव,फुलवंता,पेंढारकर,वर्षा मोरे,आदी माहिला मोठया संख्येने उपस्थितत होते.
No comments:
Post a Comment