नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - आमदार सुहास अण्णा कांदे यांनी कोंढार येथील विठ्ठल रखुमाई मंदिरासाठी तात्काळ सभामंडप मंजूर केला आणि लगेचच या सभामंडपाचे भूमिपूजन नारळ फोडून करण्यात आले.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघात मोफत फिरता दवाखाना व मोफत शासकीय कार्यालय सुविधा कॅम्प आज नांदूर व कोंढार या गावात आयोजित करण्यात आलेला असता येथील नागरिकांनी सभा मंडपाची मागणी केली. सदर बाब आमदार साहेबांना फोनवर कळविण्यात आली आणि त्यांनी त्वरित मंजुरी देत सभामंडपाचे भूमिपूजन करून घ्या असे सांगत दोन महिन्यात सभामंडप पूर्ण होईल असे आश्वासन दिले. आमदार साहेब यावेळी अधिवेशनासाठी मुंबई येथे असून देखील ग्रामस्थांच्या मागणी त्वरित मान्य करत जबाबदार कुटुंबप्रमुख असल्याचे उदाहरण स्पष्ट केले. या मुळे उपस्थित गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या प्रसंगी प्रमोदभाऊ भाबड, शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ गिडगे, राजेंद्र पवार, डॉ.सांगळे, किशोर लहाने,उत्तम पाटील,आप्पा कुनगर, रघुनाथ पारेकर, पिंटू व्हडगर, संजय आहेर, सोमनाथ घुगे, सरपंच रेखा समाधान शेंडगे, उप सरपंच सिताराम शेरमाळे, समाधान शेंडगे, संजय खांडेकर, नारायण शेंडगे, खंडू भाऊ खेमनार, संजय गोटे, जिभाऊ गोटे, सोमा गोटे, सोमनाथ हाके, सोहन हाके, दत्तू सातपुते, पांडूरंग पवार आदींसह नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment