नांदगाव (प्रतिनिधी) - मंगळवार दि. २१ मार्च रोजी 'नमन एज्युकेशन सोसायटी' संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव शाळेमध्ये गुड बाय पार्टी घेण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल, उपाध्यक्षा सरिता बागुल ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . विद्यार्थ्यांचे परीक्षा संपून विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची छोटीशी सुट्टी देण्यात येते यानिमित्ताने हा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला. या गुड बाय पार्टीमध्ये विद्यार्थ्यांना लिटिल कृष्णाचा एक चित्रपट दाखवण्यात आला. सर्व शिक्षकांनी मिळून मुलांसाठी एक हसी की आदालत नावाचे नाटक सादर केले. तसेच शाळेचे अध्यक्ष बागुल तसेच बागुल यांच्या तर्फे मुलांसाठी आईस्क्रीम वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकमेकांना भेटवस्तू देऊन बाय-बाय केले. नाचून गाऊन मुलांनी आज मनसोक्त आनंद लुटला या कार्यक्रमाचे औचित्य साधत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्षा सरिता बागुल इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना अबॅकस स्पर्धेचे बक्षीस वितरण केले . या स्पर्धेचे नियोजन व्यवस्थित पार पडण्यास अबॅकस टिचर श्रीमती निशिगंधा काकळीज यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री चौधरी यांनी केले.
हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका रोहिणी पांडे, अश्विनी केदारे, दिव्या शिंदे, एडना फर्नांडिस, मोनाली गायकवाड, चैताली अहिरे, जयश्री चौधरी, मदतनिस वैशाली बागूल, छाया आवारे, अनिता नेमणार, ज्योती सोनवणे, रवींद्र पटाईत यांनी अतोनात मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला .
No comments:
Post a Comment