नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव मध्ये शुक्रवार दि. २४ रोजी मार्च व्हीजे हायस्कूल मधील एन.सी.सी च्या विद्यार्थ्यांनी स्वानंद उपक्रम अंतर्गत नांदगाव रेल्वे स्टेशन येथे भेट दिली. आमच्या अंगवळणी पडलेल्या परंतु आजही तेवढंच आकर्षण असलेल्या रेल्वेला जाणून घेतांना विद्यार्थ्यांना वेगळाच आनंद वाटला. रेल्वे यंत्रणेचा एक भाग म्हणून आरपीएफ आणि जीआरपीएफ विभागाकडे तितक्याच जबाबदारीने पाहिले जाते. प्रवासी असतील नाहीतर रेल्वेची संपत्ती... यावर अहोरात्र निगराणी ठेवण्याच्या कामात या खाकी वर्दीधारी मंडळींचा सिंहाचा वाटा आहे. नांदगाव विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र कोर याबाबत अधिक विस्तृत बोलत होते. रेल्वे सुरक्षा, अपघात आणि उपचार, रेल्वेचे नियम, कामाच्या वेळा आणि जबाबदारी यावर अत्यंत मोकळेपणाने संवाद साधतांना त्यांना विशेष आनंद होतो. २६/११ च्या वेळी ते स्वतः ताज रेस्क्यू टिममध्ये होते. तिथला अनुभव रंजक पद्धतीने कथन करतात. याच अनुषंगाने एन.सी.सी च्या विभागाचे काम देखील त्यांनी जाणून घेतले. विद्यार्थ्यानी परेड करून छोटासा 'डेमो' त्यांना दिला त्यावेळी त्यांचे शालेय दिवस त्यांना आठवल्याचे कोर सर सांगतात. त्यांचे सहकारी खान साहेब आणि हवालदार घुगे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना लाभले. या व्हिडीओग्राफी मध्ये डंबाळे सर ,खडवी सर आणि श्रीयुत नंनावरे यांचे सहकार्य लाभले होते.काहीतरी नवीन शिकल्याचा भाव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर होता. विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे , मुख्याध्यापक बडगुजर सर, शालेय पदाधिकारी बाकळे सर, शिंदे सर, श्रीवास्तव सर यांचे या उपक्रमास मार्गदर्शन लाभले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment