मनमाड (प्रतिनिधी) - रमजान ईद या वेळी एप्रिल च्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे २४ एप्रिल ला येत आहे. ईद उत्साहात साजरी व्हावी मुस्लिम बांधव सरसावले आहेत. रमजान ईदची नमाज अदा करण्यासाठी शहरातील मुस्लिम बांधवांना आ.यु.डी.पी चे मैदानात उघड्यावर सामुदायिक नमाज पठण करावी लागणार आहे. ईदच्या नमाज पठणास मैदानावर मंडप टाकण्यासाठीचे निवेदन फुले, शाहू, आंबेडकर मुस्लिम विचार मंचतर्फे मनमाड नगरपालिका प्रशासनाला दिले आहे. काही दिवसांपूर्वी पदमभुषण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात जमलेल्या जनसमुदायास उष्माघाताचा सामना करावा लागला. त्यात जवळ जवळ १४ व्यक्ती मरण पावले होते. व ४००ते ५०० जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ईद नमाज पठणात उष्माघाताची बाधा येऊ नये , खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षी मैदानावर मोठ्या प्रमाणात मंडप टाकण्याची गरज आहे. या मागणीचे निवेदनावर फुले, शाहू, आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे शहअध्यक्ष मिर्झा अहमद बेग, सचिव विलास अहिरे, कार्याध्यक्ष फिरोज शेख, सद्दाम अत्तार , हाजी मुश्ताक सर, हाजी शफीभाई , जावेदभाई, इस्माईल पठाण, शकुर शेख, शकील तांबोळी, शकीलभाई आर.के, अमीनबाबा शेख, सलीम भाई , जानीशेठ( महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट), हाजी युनुस, मुसरीफ पठाण, तन्नु भाई आदींची उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment