Friday, May 19, 2023

मनमाड नगरपालिकेने सुरळीत पाणीपुरवठा संदर्भात पर्यायी व्यवस्था करावी - कांग्रेस शहराध्यक्ष नाजीम शेख




मनमाड ( विशेष प्रतिनिधी) -    मनमाड शहरातील पाणीप्रश्न काही नवीन नाही यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होऊन धरण ओव्हरफ्लो सुद्धा झाले. पण नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणा मुळे व नियोजनशून्य कारभारामुळे मनमाड शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.  शहरातील प्रत्येक नागरिकाला किमान मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिकेची असून एन उन्हाळ्यात २० ते २२ दिवसाआड पाणीपुरवठा करून नगरपालिका प्रशासन आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहे.
  जर वाघदर्डी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध नाही, तर आजपर्यंत नगरपालिकेने रोटेशनसाठी शासनदरबारी किती पाठपुरावा केला ? जोपर्यंत रोटेशन मिळणार नाही तोपर्यंत मनमाडकरांना तहानलेलेच सोडणार का ? वाघदर्डी धरणात पाणीसाठा उपलब्ध नाही तर नगरपालिकेने टँकर ने पाणीपुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था आजपर्यंत उपलब्ध का केली नाही ? पर्यायी व्यवस्थेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला की नाही ?असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येत आहे.
नियमित पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे, नगरपालिकेने किमान १० दिवसाआड सुरळीत पाणीपुरवठा करावा धरणात पाणीसाठा शिल्लक नसेल तर नगरपालिका प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून टँकरद्वारे प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक घरात पाणीपुरवठा करावा. नगरपालिकेने पाणीपुरवठ्याच्या बाबतीत योग्य समाधानकारक निर्णय न घेतल्यास शहरातील तमाम नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिकेच्या गलथान कारभाराच्या विरोधात पुन्हा एकदा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा मनमाडचे  नगरसेवक तथा काँग्रेस चे शहराध्यक्ष नाजीम शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....