नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषदेमध्ये सन १९९१ मध्ये रोजंदारी कर्मचारी यांना न्यायालयीन आदेशानुसार सफाई कामगार पदावर नियुक्ती मिळाली होती. शासनाच्या आदेशानुसार वारसा हक्काने वारसदारांना नियुक्ती देणे बंधनकारक असतानाही सुमारे १२ ते १३ वर्षांपासुन वारसा हक्काने नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत. या निषेधार्थ प्रशासनाला जागे करण्यासाठी वारसदारांनी उद्या शुक्रवारी (दि.७) रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शासनाच्या आदेशानुसार सन २००० पर्यंत ज्या कर्मचान्यांचे समावेशन नगरपालिकेत मध्ये करण्यात आले आहे .त्यांना वारस हक्काचा लाभ मिळणार नाही याचा नगरपालिका प्रशासनाने वेगळा अर्थ लावुन या वारसांना नगरपालिकेत नेमणुक दिलेली नाही. शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक यांचे कार्यालयाकडुन दि. २४ फेब्रुवारी रोजी चे वारस हक्काने लाभ सर्व सफाई कर्मचाऱ्यांना द्यावा असे स्पष्ट नमुद असुन सुध्दा त्या परिपत्रकाचा अवमान नांदगांव नगरपालिका प्रशासन करीत आहे. याबाबत विभागीय आयुक्त नासिक यांचे कार्यालयाकडुन देखील त्याबाबत वारसांना वारस हक्काने नियुक्ती देणेबाबत आदेश दिले असुन सुध्दा त्या पत्राचा अवमान करीत आहे. त्या विरोधात वारस हक्काने नियुक्त्या देण्यात नगरपालिका प्रशासनाचे वेळ काढूपणा व हेतुपुरस्कर टाळाटाळ करीत आहे. शासनाच्या परिपत्रकाचे सुध्दा पालन केले जात नाही, या निषेधार्थ वारसदार आपल्या कुटुंबासह एक दिवसाचे धरणे आंदोलनास नांदगांव नगरपालिका कार्यालयासमोर बसणार असल्याचे अखिल भारतीय मजूर महासंघाचे प्रदेश महामंत्री शशिकांत मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment