नांदगाव ( प्रतिनिधी) - आतापर्यंत आपण ऐकले होते... ज्ञान दान सर्वात श्रेष्ठदान आहे... इयत्ता ४ थी शिकत असलेली आराध्या अर्चना धवलचंद्र आढाव या विद्यार्थीने चक्क आपल्या जन्म दिनानिमित नांदगांव तालुक्यातील आमदार सुहास कांदे यांच्या गुरुकुल तंत्रनिकेतन ,औद्योगिक काॅलेजला मातृभाषेतून इंग्रजीकडे ज्ञान दान करुन आपला जन्म दिवस या काॅलेजच्या विद्यार्थी सोबत साजरा केला. वेगळ्या प्रकारचा संदेश समाजात देण्याचे काम या ४ थी शिकत असलेल्या आराध्या आढावने केले. त्याबदल सर्वत्र आराध्यासह तीच्या पालकांचे अभिनंदन होत आहे.आमदार सुहास कांदे, नांदगांव नगरी माजी नगराध्यक्ष डॉ .आनंद पारख,शामभाउ पारख, माजी नगर सेवक महावीर पारख, महावीर सुराणा,दिलीप पारख, शांतीलाल सुराणा ,राजेन्द्र लोढ़ा, माजी नगराध्यक्ष चेतन पाटिल ,हिंदू पंच पत्रकार अनिल धामणे यांनी अभिनंदन केले. कर्ण हे पात्र आजही दानवीर म्हणुन ओळखले जाते. कुणी श्रमदान करते, कुणी रक्तदान, कुणी अन्नदान,कुणी संपत्ती दान करते , कुणी गो दान करते, कुणी अवयव दान करते , कुणी वस्त्रदान करते कुणी सुवर्ण दान तर कुणी कन्यादान करते. परंतु जे. टी. के. इंग्लिश मीडियम स्कूल येथील इयत्ता ४ थी मध्ये शिकणारी कुमारी आराध्या अर्चना धवलचंद्र आढाव हिने आपला प्रगटदिन ज्ञानदानाने साजरा केला. कुणी म्हणेल हे कसले दान? पण आराध्या ने गुरुकुल तंत्रनिकेतन आणि गुरुकुल आयटीआय नांदगाव येथील विद्यार्थ्यांना मातृभाषेतून इंग्रजीकडे या आशयाने इंग्रजी शिकवून ज्ञान दान केले. यावेळेस गुरुकुल तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रो. झाडखंडे, आयटीआय चे प्राचार्य प्रो. थेटे तसेच समस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.एस. क्षीरसागर सर यानी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment