मनमाड( विशेष प्रतिनिधी) - नुकताच नाशिक येथे पार पडलेल्या इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धेत मनमाडच्या माही सुरज अरोरा हिने तृतीय पुरस्कार मिळवत मनमाड शहरासह नाशिक जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. मनमाड येथील शान क्लासेसतर्फे यानिमित्ताने एक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी माहीला रोख रक्कम व प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.या पुरस्काराबद्दल माहीचे मनमाड शहरातील सर्व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
नाशिक येथे शनशाईन एज्युकेशन हबतर्फे इंग्लिश मॅरेथॉनच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या . या स्पर्धेत मनमाड येथील माहिशान क्लासेसच्या वतीने १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . यात माही सुरज अरोरा हिने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकावत मनमाड शहरासह नाशिक जिल्ह्याचे नाव रोशन केले. यासह इतर विद्यार्थ्यांनी देखील पुरस्कार पटकावले या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर नाशिक येथील सचिन जाधव जयेश सर मिनाक्षी महाना सौ. पूनम पाटील,सौ. रवींद्रकौर कांत, सूरज अरोरा, जावीद शेख ,सौ.निलम अरोरा,सुशिल अरोरा आदीजन उपस्थित होते सचिन जधाव यांनी इंग्लिश स्पिकिंग व व्याकरण चे उपस्थितांना मार्गदर्शन केले.व इंग्रजी अगदी सोपी भाषा असुन त्यावर आपण सहज प्रभुत्व प्राप्त करू शकतो असेही सांगितले.राज्यस्तरीय स्पर्धेतील गुणवंत विदयार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.या विद्यार्थ्यांना यशोदीप शिंदे यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment