नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील येथील आदर्श प्राथमिक शाळा येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षा मधे नांदगाव मधील विविध शाळेतील १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. त्यांचा कौतुक सोहळा ट्रॉफी , प्रमाणपत्र देऊन साजरा करण्यात आला. या प्रसंगी आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव चे मुख्याध्यापक तांदळे सर तसेच कमलाबाई कासलीवाल शाळेचे मुख्याध्यापक सावंत छाजेड विद्यामंदिर चे प्रसाद बुरुकुल माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव येथील अनिल नागरे सर तसेच जिल्हा परिषद शाळा ठाकरवाडी येथील मुख्याध्यापक सतीश बिरारी आदर्श कोचिंग क्लासेस च्या संचालिका श्रीमती तवले व परीक्षा केंद्राचे संचालक पंकज सोनवणे व उपस्थित होते. यावेळी आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव येथील विद्यार्थी राज अरुणकुमार जाधव , राजवीर वीरेंद्र तवले , छाजेड विद्यामंदिर येथील रुद्रांश सचिन जाधव , स्वराज चेतन निकम, वेदश्री प्रसाद बूरुकुल, रिशिता शैलेश टिळेकर, व्ही जे हायस्कूल येथील देवांश चंद्रशेखर चव्हाण, श्रुती बिभीषण मोरे , जिल्हा परिषद शाळा महाजन वाडा येथील अद्विक विशाल सावंत , जिल्हा परिषद शाळा नायडोंगरी येथील कृष्णा कैलास बोरसे, लिट्ल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल येथील स्वरा सतीश बिरारी, जे टी के इंग्लिश मिडीयम स्कूल येथील आर्या ललित पगार , समृध्दी प्रवीण सौंदाने,माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव येथील यज्ञेश अनिल नागरे , न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील आरुषी गणेश बोरसे व वर्धमान हायस्कूल मालेगाव येथील यश समाधान पवार या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी आदर्श प्राथमिक शाळा चे शिक्षक जाधव चव्हाण.सुभाष पवार व सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले, तर जाधव सर यांनी आभार मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment