नांदगांव( प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले आणि निष्क्रिय ठरणारा पत्रकार हल्ला विरोधी कायदा याविरोधात मराठी पत्रकार परिषद मुंबई व नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि. नाशिक संलग्न नांदगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी रोजी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविले जावेत व पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई व्हावी आदी मागण्याचे निवेदन, नांदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांना देण्यात आले.
महाराष्ट्रात ८ नोव्हेंबर २०१९ पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे. मात्र राज्यात या कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने कायदा कुचकामी ठरला आहे. राज्यात गेल्या चार वर्षात सुमारे दोनशे पत्रकारांवर हल्ले झाले आहेत, मात्र केवळ ३७ प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केला आहे. त्यातही एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने हा कायदा कमकुवत ठरत आहे. नुकतेच पाचोरा येथील एका पत्रकारास पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ करून गुंडांकडून त्यांच्यावर हल्ला केला आहे. या प्रकरणातही आमदार पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही. पत्रकारांवरील वाढते हल्ले थांबावेत व लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता यावे यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याचे निर्देशात आले आहे यामुळे कायदाचा धाक कोणाला राहिला नाही या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे संबंधित यंत्रणेला द्यावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार संजीव धामणे, जेष्ठ पत्रकार विजय चोपडा, पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारी सदस्य बब्बू भाई शेख, नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश शेळके सरचिटणीस आमीन शेख माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब कदम, उपाध्यक्ष चंद्रकांत भालेराव, भगवान हिरे, भरत देवरे, मोहम्मद भाई शेख, सुहास पुणतांबेकर, रोहित शेळके, अनिल धामणे, महेश पेवाल,परवेझ
शेख, राईस शेख, जुनेद शेख, अझर शेख, आवेस कुरेशी आदींची पत्रकार उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment