Friday, August 18, 2023

कोपरगांव तालुक्यात पवित्र कुरआन पाकची काही समाजकंटकाकडून विटंबना, नांदगावात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चा,






 नांदगाव (प्रतिनिधी ) - अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात काही समाज कंटकांनी मुस्लिम धर्मियांचे धार्मिक ग्रंथाची विटंबना केली. यासह मणिपूर येथील महिलांवरील अत्याचार तसेच ख्रिश्चन समाजाचे धार्मिक स्थळाची तोडफोड यासह इतर मुद्द्यावर मुस्लिम बांधवांच्या वतीने नांदगाव शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. सर्व सर्वपक्षीय नेत्यानी भाषण करून आरोपींना अटक करून कारवाईची मागणी केली.
 यावेळी पोलिस निरीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी जवळपास सर्वच राजकिय पक्षांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाची सुरुवात जामा मस्जिद, महात्मा फुले चौक, महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अशी होत गेली. 
        नांदगाव कांग्रेस चे मनोज चोपडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. विविध जातीजातीत , धर्म - धर्मात तेढ निर्माण होईल असे षडयंत्र  रचले जातंय. त्यामुळे देश अधोगती जाणार आहेत.  जगात इस्लाम धर्म अमन, शांती मानत आलेला आहे. आपल्याला खरं देशभक्त कोण यांचा पुरावा द्यावा लागत आहे." सारे जहाँ से अच्छा हिन्दुस्तान हमारा" हे गीत मुस्लिमाने लिहिले आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील गावात काही विकृत मानसिकतील लोकांनी पवित्र कुरआन शरीफ फाडले . यावेळी त्यांनी कुराण मधील आयतीचा संदर्भ दिला. या घटनेचा निषेध करत प्रशासनाला सांगितले की अशा समाजकंटका विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. प्रसिद्ध शायर राहत इंदोरीचा, उँचे उँचे दरबारो से क्या लेना , नंगे - भूखे गरीबों से क्या लेना , अपना खालीक अफजल है, आतीजाती सरकारों से क्या लेना शायरीतून मत व्यक्त केले. या मुक मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच आरपीआयचे नाना जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. मणिपूर घटनेविषयी बोलताना, मणिपूर मध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार करण्यात आले. तेथे त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. ख्रिश्चन धार्मिक स्थळांवर हल्ले करण्यात आले. यावेळी त्यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध केला.  या मोर्चात वंचित चे बाळा बोरकर , आरपीआयचे नाना जाधव, कांग्रेस चे मनोज चोपडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संतोष गुप्ता, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे फिरोज शेख यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. या मोर्चात माजी नगरसेवक याकुब शेख, मुश्ताक शेख, जमेअत उलमा हिंदचे सेक्रेटरी जावीद सय्यद , तौसीफ शेख, आबीद सय्यद, हाफीज अश्पाक साहब, इब्राहिम शेख, रियाज कुरैशी, नाज शेख, आसीफ शाह, साजीद शाह इत्यादी समस्त मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....