नांदगाव (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वांचीत नाशिक युवक जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांच्या निवडीनंतर नांदगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने युवक कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा सत्कार समारंभ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुका युवकाचं जास्तीत जास्त संघटन करण्यासंदर्भात येणाऱ्या काळात तालुक्यात होणाऱ्या उपक्रमासंदर्भात चर्चा झाली. कुठल्याही परिस्थितीत यानंतर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये नांदगाव तालुक्यात अजितदादा पवार व भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. तसेच युवक जिल्हाध्यक्ष चेतन कासव, तालुकाध्यक्ष विजय पाटील, बूथ कमिटी अध्यक्ष देवदत्त सोनवणे यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
यावेळी सोपान पवार, प्रसाद सोनवणे, शिवाजी जाधव, प्रशांत बोरसे, यांनी मनोगत व्यक्त केले, तर सूत्रसंचालन दिगंबर सोनवणे यांनी केले.
याप्रसंगी युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार , तालुकाध्यक्ष विजय पाटील, मविप्र व कृ. उ. बा. समिती संचालक अमित बोरसे पाटील, प्रसाद सोनवणे, युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, दत्तू पवार, संतोष अडांगळे, राजेंद्र लाठे, राजेंद्र सावंत, देवदत्त सोनवणे, रवींद्र सुरसे, अशोक पाटील, दिगंबर सोनवणे, शिवा सोनवणे, सुरेश गायकवाड, डॉ. भरत जाधव, प्रशांत बोरसे, शिवाजी जाधव, महेश पवार, सचिन कोरडे, पृथ्वीराज चव्हाण, मनोज कोरडे, सागर आहेर, अशोक पवार, उमेश पवार, लक्ष्मण गायकवाड, राकेश पवार, साईनाथ शिरसाठ, सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर सुरसे, पवन खैरनार, अजय गव्हाणे, राजेंद्र निकम, सागर चव्हाण, दीपक घाडगे, सचिन पवार, वैभव पवार, अविनाश थोरात, राहुल माने, दर्शन सानप, हर्षल बेंडकुळे, वरून ठाकूर, प्रेम सोळसे, ज्ञानेश्वर बच्छाव, गोकुळ चव्हाण, जगदीश सुरसे, रोहित बोरसे, भूषण बोरसे, कल्पेश इंडाईत, पुरुषोत्तम बागुल, विशाल बोरसे, हेमंत मोरे, महेश कदम, राहुल काटकर, सनी सोळसे, वाल्मीक काटकर, अभिजीत पवार, सिद्धांत काकळीज, शुभम जगताप, सिद्धार्थ जगताप, विजय बोरसे, रवींद्र कदम, अमोल सोनवणे, सिद्धार्थ बागुल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment