Sunday, September 17, 2023

नांदगाव शहरात आगामी सण - उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीच्या वतीने बैठक, काही चुकीची माहिती असल्यास संपर्क साधावा , मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख यांचे आवाहन,



नांदगाव (प्रतिनिधी ) -  या वर्षी नांदगाव तालुक्यात पाऊस कमी आहे , त्यामुळे लहान मूर्तीच्या विसर्जनासाठी नगरपालिकेच्या वतीने शिवसस्फूर्ती चौकात कृत्रिम तलाव तयार केला जाणार आहे. मोठ्या मूर्तीचे जतन करण्यात येणार आहे. तसेच मिरवणुकीच्या मार्गातील अडथळे दूर करणार असल्याचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत सांगितले.
     आगामी गणेश विसर्जन व महंमद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदगाव पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन शुक्रवार रोजी करण्यात आले होते.
आगामी गणेशोत्सवात व ईद उत्सव मिरवणूकित पारंपरिक वाद्य वाजवावी, तसेच गणपती मंडळांनी २४ तास स्वयंसेवक नेमवावे, मंडळांनी वीज वितरण कंपनी कडून अधिकृत कनेक्शन घ्यावे कार्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटी राहून गणेश उत्सव व ईद (ईद-ए-मिलाद) साजरा करावा, तसेच या कालावधीत सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा काही चुकीची माहिती दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन मनमाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांनी केले.  
    यावेळी नांदगाव तालुक्याचे तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांनी सांगितले की , गणेश मंडळांना प्रशासनाचे सर्व सहकार्य मिळेल.  यावेळी नांदगाव पोलीस ठाण्यात चे पोलीस निरीक्षक प्रीतम चोधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गणपती मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे करावेत. उत्कृष्ट देखावे तयार करणाऱ्या मंडळांना पोलीस स्टेशनचे अधिकारी पाहणी करून उत्कृष्ट कार्यक्रम घेणाऱ्या मंडळांना नांदगाव पोलीस ठाण्यातर्फे प्रशस्तीपत्र, बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. मंडळांनी सामाजिक उपक्रम राबाबे, असे आव्हान केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे म्हणाले की, या वर्षी दुष्काळी परिस्थिती असून मंडळांनी, जादा खर्च न करता, खर्चामध्ये बचत करून भविष्यात पाण्याच्या कामावर खर्च करून सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नांदगाव  तालुका व्यापारी संघटनेचे बाळासाहेब कवडे, वाल्मिक जगताप, संदीप जेजुरकर यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी नगरपालिकेचे कर निरीक्षक राहुल कुटे, सहायक पोलीस निरीक्षक नितिन खंडागळे, पोलिस उपनिरक्षक मनोज वाघमारे, उपनिरीक्षक संतोष बहाकर , हवालदार राजू मोरे, दत्ता सोनवणे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण चे सहायक अभियंता, डी. डी. पाटिल,
नरेंद्र पाटिल, याकुब शेख, सिध्दार्थ पवार ,मुस्ताक शेख, आरिफ मंसुरी , नासिर शेख, कपिल तेलुरे , वाल्मिक पवार, नांदगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश शेळके, महेश पेवाल,कलिम शेख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

आमदार सुहास कांदे व उत्सव समितीच्या अध्यक्षा अंजुम कांदे यांच्या हस्ते पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत पूजा, ८ किलो वजनाचे चांदीचे विविध अलंकार अर्पण !!

नांदगाव (प्रतिनिधी)  -  नांदगाव येथील ग्रामदैवत असलेल्या श्री एकविरा देवीचा यात्रोत्सव बुधवार (दि.१) पासून मोठ्या उ...