नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगावच्या मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान नाट्य महोत्सव सन २०२३ - २४ या (अंधविश्वास आणि विज्ञान)या विषयावर नाटिका सादर केले होते. या स्पर्धेत एच. आर. हायस्कूल या विद्यालयाने द्वितीय क्रमांक घेतला. नाटिकेत मारीया तंबोली, जुबिया शेख, आयमन शेख, नशराह शेख, रिमशा मोमीन, इकरा शेख, मूनजजा शेख, सिमरन शेख, महेविश खाटीक, अल्वीरा अनम शेख या विद्यार्थ्यांनी नाटिकेत उत्कृष्ट काम केले . त्यांना मार्गदर्शन विज्ञान शिक्षक सज्जाद सर यांनी केले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment