नांदगाव (प्रतिनिधी ) - दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नांदगाव तालुका वगळण्यात आला आहे. तालुका प्रशासनाने वस्तुस्थितीदर्शक खुलासा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. नांदगाव तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात शासन निर्णयान्वये दुष्काळाचे मूल्यांकन करण्याची सविस्तर कार्यपद्धती निश्र्चित करण्यात आली आहे. खरीप -२०२३ हंगामामध्ये दुष्काळाचे मूल्यांकन Maha-Madat प्रणालीमार्फत करण्यात आले असून जिल्हानिहाय Trigger-1 व Trigger-2 लागू झालेले तालुके निश्चित करण्यात आले आहेत. या मुल्यांकनानुसार राज्यातील ४२ तालुक्यामध्ये Trigger-2 लागू झाला आहे Trigger-2 लागू झालेल्या तालुक्यामध्ये केवळ दुष्काळामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याचे क्षेत्रीय सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्याकरिता अशा तालुक्यातील १०% गावे अकस्मात तपासणी (रँडम ) पद्धतीने निवडून प्रतिकूल परिस्थितीत समाविष्ट करण्यासाठी उपाययोजना राबविणे अपेक्षित असते. तालुका प्रशासनाने जाहीर केलेल्या आणेवारी बद्दल संपूर्ण तालुक्यात असमाधान असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सादर केलेल्या अहवालावर संशय घेण्यास वाव निर्माण करणारी परिस्थिती उपरोक्त परिपत्रकान्वये सिद्ध झालीआहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. Trigger-2 लागू झालेल्या तालुक्यात करावयाच्या क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर सवेंदन उपयोजन केंद्र ,नागपूर ( MRSAC) यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या Maha-Madat या मोबाईल अँप च्या माध्यमातून तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळ मध्यम स्वरूपाचा किंवा तीव्र स्वरूपाचा आहे याबाबतचा उल्लेख करून आपला अहवाल राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समिती मार्फत शासनास पाठविण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत . जिल्ह्यातील सर्वात निच्चांकी पर्जन्यमानाची नोंद नांदगाव तालुक्यात झाली. त्याचा परिणाम एकूण खरीप हंगामावर होऊन उत्पन्नावर झाला आहे . पाऊस नाही म्हणून भूगर्भातील जलपातळी घटली आहे. दुसरीकडे एकूण उपलब्ध जलसाठे कोरडेठाक पडले आहेत . त्यात पुन्हा दिवसेंदिवस टँकर्सची संख्या वाढत आहे . पुन्हा भरीस भर म्हणून जनावरांच्या पिण्याचे पाणी व चारा टंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे . प्राथमिक नजर आणेवारी ३२ पैसे ते ३६ पैशाच्या आत आहे अशी सर्व पार्श्वभूमी असूनही Trigger-1 व Trigger-2 मधून नांदगाव तालुक्याला वगळण्यात आले आहे. त्यासाठी कोणते निकष गृहीत धरण्यात आलेत त्याचे स्पष्टीकरण झालेच पाहिजे . कारण दुष्काळग्रस्त नांदगाव तालुक्यावर अन्याय आहे म्हणून या क्षेत्रीय सर्वेक्षणाची योग्य कार्यवाही करणे व त्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास नमूद वेळेत काटेकोरपणे पाठविणे अपेक्षित आहे. जेणेकरून दुष्काळाची परिस्थिती ग्राह्य धरून नांदगाव तालुका दुष्काळी घोषित करण्याची कार्यवाही प्रशासनास करता येईल . कामात प्रशासनाच्या वतीने हयगय झाल्यास होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी प्रशासनाची राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment