Monday, October 30, 2023

नांदगाव येथे वारकरी आदर्श पुरस्काराचे वितरण सोहळा, मनोज जरांगे पाटील यांच्या मताशी मी सहमत - आमदार सुहास कांदे,




नांदगाव( प्रतिनिधी ) - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी माझ्या परीने पूर्णतः प्रयत्न करणार आहे. वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देण्यास हयगय करणार नाही, असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी शहरात झालेल्या वारकरी व पूजन व आदर्श वारकरी पुरस्कार सोहळ्याप्रसंगी केले.
आमदार कांदे पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मताशी मी सहमत असून, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा चा समाजाला आरक्षण मिळावे. सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या  मागणीला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्ताधारी पक्षाचा आमदार या नात्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सासाठी प्रयत्न करणार असून, वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला तर तोही देईन, असे सांगितले. मतदारसंघातील साधू, संत, महंतांचे पाद्यपूजन करण्यात आले. याकरिता श्रीक्षेत्र काशी,
प्रयागराज, हरिद्वार देवप्रयाग, ऋषिकेश येथून नद्यांचे पवित्र जल संकलन करून आणले होते. यावेळी बुलढाणा येथील पुरूषोत्तम महाराज पाटील यांची कीर्तनसेवा झाली. त्यांनी सांगितले की, राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असताना आ. कांदे महाराष्ट्रातील एकमेव असे आमदार आहेत की, ज्यांनी वारकरी संप्रदाय, साधूसंत, महंत यांचा सन्मान करत असताना एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला असून, कोणत्याही प्रकारचा त्यांना विरोध महाराज केला नाही. यातच त्यांची समाजाच्या विविध स्तरांतील लोकांसाठी करत असलेल्या कामांची पावती आहे.
    यावेळी आदर्श वारकरी पुरस्कारांचे वितरण आमदार सुहास कांदे, अंजुम कांदे यांच्या हस्ते करण्यात येऊन मतदारसंघातील १४८ गावांतील दोनशे भजनी मंडळांना दहा टाळ-मृदंग, वीणा भेट देण्यात आले. कार्यक्रमासाठी वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज जेऊरकर, जयरामबाबा गोंडेगावकर, श्रावण महाराज अहिरे, माधवगिरी महाराज, नामदेव महाराज बोगीर, रामकृष्ण बानगावकर, दत्तात्रय महाराज, बाळकृष्ण महाराज, आनंद महाराज, जोंधळवाडीकर महाराज सर्व आखाड्यांचे महंत, संत, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार गायनाचार्य व मृदंगाचार्य तसेच मतदारसंघातील सर्व गावागावांतील भजनी मंडळी व नागरिक तसेच सर्व शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी नंदकिशोर महाराज दौंड यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील विद्यालयात 'अत्याधुनिक संगणक लॅब' तून विद्यार्थ्यांना संगणकीय धडे मिळणार,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारीत मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल  भिकचंद छाजेड विद्यालयात नूतनीकरण करण्यात ...