Tuesday, November 28, 2023

नांदगाव तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची भाजपच्या वतीने पाहणी दौरा,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील  झालेल्या गारपीट आणि तुफान वादळ पाऊसाने, आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात बऱ्याच शेतकरी बांधवांच्या शेतीचे, घरांचे, जनावरांचे बरेच नुकसान झाले. निसर्गाच्या झालेल्या अशा प्रकोपाची तत्काळ दखल घेत  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ.भारती  पवार यांचे स्वीय सहायक प्रवीण रौंदळ यांनी नांदगाव तालुक्यातील नुकसानाची पाहणी केली.  शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले. नांदगाव तालुक्यातील गारपीट ग्रस्त जामदरी, आदी भागांना या वेळी भेटी देण्यात आल्या. या वेळी पाहणी दौऱ्यात भा.ज.पा च्या जेष्ठ नेत्या ॲड. जयश्री ताई दौंड, भा.ज.पा किसान मोर्चा चे नाशिक जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे, भा.ज.पा नांदगाव तालुका अध्यक्ष गणेश भाऊ शिंदे, भा.ज.पा नांदगाव शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, तालुका सरचिटणीस संदिप पगार, नांदगाव शहर सरचिटणीस राजेंद्र गांगुर्डे, ओ.बी.सी मोर्चा चे शहर अध्यक्ष दिनेश दिंडे सर आणि भा.ज.पा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ॲड. जयश्रीताई दौंड यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला व सरसकट पंचनामे करावे अशा सूचनाही उपस्थित सर्कल, तलाठी, ग्रामसेवक यांना दिल्या. आणि कोणत्या ही अधिकाऱ्याने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात कसूर केला त्याची गय केली जाणार नाही अशा सुचना त्या वेळी दिल्या.  केंद्रीय मंत्री भारती  पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडे नुकसान भरपाई मिळुन देण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रौंदळ व भा.ज.पा पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगुन आश्वस्त केले व धीर दिला. या पाहणी दौरा वेळी भा.ज.पा चे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्कल, तलाठी, ग्रामसेवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....