नांदगाव ( प्रतिनिधी) - आमदार सुहास आण्णा कांदे यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी सोबत प्रांत गाढवे साहेब, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, बीडीओ दळवी साहेब, संबंधित ग्रामसेवक, तलाटी सोबत होते.
जोंधळवाडी शास्त्रीनगर व धोटाने नागापूर या परिसरातील झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची पाहणी यावेळी करण्यात आली. काल झालेल्या गारपिटी मुळे शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतमाल उध्वस्त झाल्याचे दिसून आले.
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शेतात बांधावर जाऊन शेतमालाचे नुकसान झालेल्या संबंधित शेतकऱ्यांना व कुटुंबीयांना भेट दिली. त्यांच्याशी संवाद साधला घटनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी लवकरात लवकर आपणास नुकसान भरपाई मदत मिळून देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती सांगून तात्काळ नुकसान भरपाई मंजूर करून घेणार असल्याचे शेतकरी बांधवांना सांगितले.
याप्रसंगी सर्व शिवसेना पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment