Thursday, November 9, 2023

नांदगाव तालुका जाहीर करण्यासंदर्भात तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांनी बैठक घेण्याचे दिले आश्वासन,




नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्याची दुष्काळाची दहाकता व शेतकऱ्यांसह पशुधनाची अनावस्था पाहता नांदगाव तालुका दुष्काळी घोषित करावा यासाठी नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) वतीने नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर होत नाही , तोपर्यंत नांदगाव तहसील कार्यालया समोर मंगळवार दि. ७ नोव्हेंबर २०२३ पासून तालुकाध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले होते . राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना रविवारी दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.  त्या अनुषंगाने मंत्री छगन भुजबळ  यांनी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत नांदगाव तालुका दुष्काळी व्हावा अशी मागणी केली. त्यानंतर गुरुवारी दि. ९ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाची दुष्काळासंदर्भात खास बैठक झाली व या बैठकीत नांदगाव तालुक्यातील एकूण आठ मंडळांपैकी पाच मंडळे दुष्काळी जाहीर करण्यात आले त्यात मनमाड, नांदगाव, जातेगाव, वेहळगाव व हिसवाळ ही मंडळे दुष्काळी घोषित करण्यात आली. उर्वरित तीन मंडळे म्हणजेच बाणगाव, न्यायडोंगरी व भार्डी या मंडळात पर्जन्यवृष्टी मापक नसल्याकारणाने ही मंडळे अद्यापही दुष्काळी घोषित होणे बाकी आहेत.  परंतु लवकरात लवकर ही तिनही मंडळे दुष्काळी जाहीर होतील,  असे दूरध्वनी द्वारे मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व उपोषणकर्ते कार्यकर्त्यांना सांगितले.याचबरोबर मागील वर्षी अतिवृष्टी व गारपीट झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान मिळावे तसेच वाड्या वस्त्या व गावासाठी पिण्यायोग्य पाणीपुरवठा करणे, जनावरांसाठी चारा व पाणी उपलब्ध करून चारा छावणी सुरू करणे, शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करणे, तसेच २०२३-२४ च्या शेतीसाठी झालेल्या खर्चाचे नुकसान भरपाई मिळणे इत्यादी मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.  यासाठी नांदगाव तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी येत्या चार ते पाच दिवसात मीटिंग घेऊन सर्व डिपार्टमेंट च्या अधिकाऱ्यांना बोलवून सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले.
          नांदगांव तालुका तहसीलदार डॉ .सिद्धार्थ मोरे, तालुका कृषी अधिकारी आर .जी. डमाळे व गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, अरुण पाटील, विनोद शेलार, अमित पाटील, प्रसाद सोनवणे, सोपान पवार, राजेंद्र लाठे, बाळासाहेब देहाडराय, गौतम जगताप, दिगंबर सोनवणे, प्रताप गरुड, रामदास पवार, पंडित सूर्यवंशी, अशोक पाटील, देवदत्त सोनवणे, वाल्मिक टिळेकर, दत्तू पवार, किसन जगधने, सुशील आंबेकर, राजेंद्र सावंत, देविदास पगार, अतुल पाटील, प्रल्हाद मंडलिक, योगेश पाटील, घनश्याम सुरसे, विश्वनाथ बोरसे, प्रशांत बोरसे, हरिदास पाटील, तानसेन जगताप, शंकर शिंदे, जगदीश सुरसे, महेश पवार, शिवाजी जाधव, दारासिंग भिडे, चंद्रकला बोरसे, सुगंधा खैरनार, अलका आयनोर, सखाराम चव्हाण, बापू खैरनार, संतोष सरोदे, सचिन जेजुरकर, संपत पवार, बापू बिन्नर, भगवान मोरे, रमेश राठोड, सागर आहेर, संजय मोकळ, कृष्णा त्रिभुवन, अर्जुन खेमगर, मच्छिंद्र हिरे, जाहीर सौदागर, शुभम बोरसे, मंगेश देशमुख, बाळासाहेब महाजन लक्ष्मण बोगीर, सखाराम भुसनर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....