नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगावच्या दहेगाव चौफुली येथील बाळकाका कलंत्री काटा समोर दशरथ शिंदे यांचे चहाचे हॉटेल असून हॉटेलच्या मागे शेतीपरिसर आहे. हॉटेल च्या मागून एक पांढऱ्या तोंडाचा साप दगडा मध्ये जाताना दशरथ शिंदे यांना दिसला. त्यांनी ताबडतोब सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला. सर्पमित्र बडोदे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि दगड हलवले असता त्यांना एक वेगळ्याच प्रकारचा नाग या ठिकाणी लपल्याचे आढळले. अश्या प्रकारचा साप पहिल्यांदाच बघायला मिळाला होता. या नागाची लांबी जवळपास चार फूट होती. नागाच्या तोंडाकडचा भाग फाटलेला असून तोंड पूर्णपणे पांढरे पडले होते. कदाचित मुंगूस व नागामध्ये द्वंद्व झाले असावे आणि नाग मुंगसाच्या तावडीतून सुटलेला असावा. नागाच्या तोंडाला जखम झालेली होती. अश्या प्रकारचा नाग पहिल्यांदाच सापडल्याने याची माहिती मिळविण्यासाठी सर्पमित्र बडोदे यांनी सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना या नागाचे फोटो पाठवले. राहुल शिंदे यांनी फोटोचे निरीक्षण केले आणि मुंगसाने या नागाचे तोंड फाडल्याचा अंदाज असून यामुळे या नागाची शिकार करण्याची क्षमता कमी झाली असावी. यामुळे हा नाग अशक्त झाला असावा. अशक्तपणा मुळे या नागाला योग्य प्रमाणात पोषण मिळाले नसावे आणि त्याच्या शरीरातील मेलनीनचे प्रमाण कमी होऊन याच्या त्वचेचा मूळ रंग जाऊन त्या ठिकाणी पांढरा रंग येत आहे किंवा हा पूर्वीपासूनच लुसिस्टिक म्हणजे पांढरा असावा आणि त्याच्या शरीराला आलेल्या पांढऱ्या रंगामुळे तो मुंगसाच्या नजरेस सहजरित्या पडला असावा आणि त्यातून तो मुंगसाकडून जखमी झाला असावा. याच्या शरीरावर आलेल्या पांढऱ्या रंगामुळे हा लुसिस्टिक होत असून या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत लुसिझम म्हणतात. ल्युसिझम म्हणजे रंगद्रव्य हस्तांतरणातील दोषामुळे मेलेनिनचे आंशिक किंवा पूर्ण नुकसान झाल्याने रंगद्रव्य कमी होते आणि ती त्वचा रंगहीन होते किंवा तिथे पांढरा रंग येतो. या नागाचा संपूर्ण तोंडाचा भाग पांढरा पडला असून शरीराच्या काही भागांवरील खवलेही पांढरे झाले आहेत असे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी सांगितले. सर्पमित्र विजय बडोदे यांनी या नागास पशुवैद्यकीय डॉ यांच्याकडे नेऊन उपचार केले आणि नांदगाव वनविभाग नोंद करून या नागास तात्काळ त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment