नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव मधील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुलींनी राज्यस्तरावर यश संपादन केले. या स्पर्धेत महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या . अकोला येथे ०१ डिसेंबर ते ०३ डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत पाच विद्यार्थिनी कॉटर फायनल मध्ये प्रवेश केला. तेथे त्यांचा निसटता पराभव झाला . मात्र एका विद्यार्थिनीची राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने विजयी झाली. या यशस्वी विद्यार्थिनीचे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब शिरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, नांदगाव चे संचालक अमित भाऊ बोरसे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एन शिंदे उपप्राचार्य डॉ. संजय मराठे सर्व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थिनी खेळाचे योग्य व तांत्रिक मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक लोकेश गळदगे व कनिष्ठ महा. उपप्राचार्य दयाराम राठोड यांचे लाभले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment