नांदगाव ( प्रतिनिधी ) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळ, पुणे व नाशिक जिल्हा क्रीडा विभाग समिती, नाशिक तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित कॉर्फबॉल मुले - मुली या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन बुधवारी दि. ६ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील एकूण नऊ संघांनी सहभाग नोंदविलेला होता. नांदगावच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत संघाने अंतिम सामना जिंकून नाशिक जिल्हा आंतर महाविद्यालयीन कॉर्फबॉल क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद सलग दुसऱ्या वर्षी मिळवले आहे.
नांदगाव महाविद्यालयाने प्रथम फेरीत सी.बी.सी महाविद्यालय, द्वितीय फेरीत के. टी.एच. एम. महाविद्यालय तर अंतिम सामन्यात लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संघांना पराभूत करून विजेते पदाचा मान मिळवला. या नांदगाव महाविद्यालयाच्या संघातील मुलांमध्ये ( खेळाडू ) - डोळे कैलास, कार्तिक औशिकर, निखिल औशिकर, गणेश आहेर, गणेश महाले, बाजीराव कासार, युवराज दूंदे तर मुलींमध्ये ( खेळाडू )कोमल बच्छाव, अश्विनी एरम, अश्विनी औशिकर, जागृती सोनवणे, प्राची सोर यांचा सहभाग होता. या यशस्वी विद्यार्थिनीचे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब शिरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, नांदगावचे संचालक अमित बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थिनींना खेळाचे योग्य व तांत्रिक मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक लोकेश गळदगे व कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्य दयाराम राठोड यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment