नांदगाव (प्रतिनिधी ) - मनमाड येथील रेल्वे पुलाचा काही भाग कोसळला असल्यामुळे मनमाड मार्गे जाणारी शिर्डी, अहमदनगर व आंतरराज्य वाहतूक नांदगाव मार्गे वळविण्यात आल्याने नांदगाव शहरातील वाहतुकीची समस्या निर्माण झाली असून वाढलेल्या वाहतूकीने एका महिलेचा बळी घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून नांदगाव पोलीस व नाशिक ग्रामीण पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत सात हजार आठशे रुपये दंड वसूल केला आहे.पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी शहरातील व्यापारी व नागरिकांना आव्हान केले . वाहतूकीला अडथळा ठरणारे सामान काढून घेऊन सहकार्य करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाड शहरातील रेल्वे उड्डाणपूल पुलाचा काही कोसळला असल्यामुळे सर्व वाहतूक नांदगाव मार्गे वळविण्यात आली असून शहरातील वाहतूकीत प्रचंड वाढ झाली मुळातच शहरातील रस्ते अरुंद असल्याने तसेच या मार्गावर शाळा, महाविद्यालय, बँक आहे. नागरिकांना यामुळे मोठा त्रास होत असून रहदारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून नाशिक ग्रामीण व नांदगाव पोलीसांनी संयुक्त कारवाई करत सात हजार आठशे रुपये दंड वसूल केला आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी शहरातील व्यापारी व रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना आवाहन केले आहे की वाहतूकीला अडथळा ठरणारे दुकानाबाहेर ठेवलेले सामान काढून घेण्यात यावे अन्यथा नागरिकांना चालण्यासाठी पादचारी मार्ग मोकळा करून द्यावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.
No comments:
Post a Comment