नांदगाव (प्रतिनिधी ) - केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नाशिक जिल्ह्यांत या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. निर्यात बंदी मुळे कांद्याचे भाव गडगडले आहे. बाजार समितीत कांदा लिलावावर यांचा परिणाम झाला आहे. या निर्यात बंदीचा पुनर्विचार करावा यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची दिल्लीत भेट घेतली . त्यांना कांद्यावर लादलेल्या बंदीचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले . जेणेकरुन कांदा शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही , असे पत्राव्दारे त्यांनी मागणी केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment