नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव मध्ये शालेय पोषण आहार मदतनीस महिलांचे मानधन वाढीसह इतर मागण्यांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर पाचव्या दिवशी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
आधारवड महिला संस्थेच्या महिलांचे उपोषण गेल्या पाच दिवसांपासून सुरू होते. यासाठी विविध सामाजिक, राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. शालेय पोषण आहार समितीच्या मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांना मानधन वाढवून मिळावे, विमा संरक्षण मिळावे, शासकीय कर्मचारी म्हणून रुजू करुन घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळ गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या होत्या.
अखेर पाचव्या दिवशी जिल्हा परिषदेचे अधिकारी बच्छाव यांनी नांदगाव येथे येवून उपोषणाला बसलेल्या महिलांची भेट घेऊन आपल्या मागण्या शरद गोसावी, शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांनी प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना कळविण्यात आले असून , हा धोरणात्मक निर्णय असून शासन स्तरावर सकारात्मक घेण्याचे आश्वासन बच्छाव यांनी दिल्यानंतर महिलांच्या वतीने संगीता सोनवणे यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी दळवी, प्रभारी शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पो. नि. नितीन खंडागळे संतोष गुप्ता, गुरु निकाळे. फिरोज शेख आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment