नांदगाव (प्रतिनिधी) - आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आमदार निधी अंतर्गत नांदगाव पोलीस ठाणे यांना चार संगणक सेट व दोन प्रिंटर देण्यात आले. सौ.अंजुमताई कांदे यांच्या हस्ते नांदगाव पोलीस ठाणे येथे चार संगणक व दोन प्रिंटर देण्यात आले. नांदगाव पोलीस ठाणे यांनी संगणक व प्रिंटर सेटची मागणी केली होती. यानुसार आमदार निधी अंतर्गत त्यांना संगणक व प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिप्रमुख उज्वला खाडे , मनमाड शहर प्रमुख संगीता बागुल, नांदगाव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी , सागर हिरे , शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव , भाऊराव बागुल , शशी सोनवणे ,गुलाब चव्हाण ,भैया पगार , संजय महाजन, संदीप सूर्यवंशी , बापूसाहेब जाधव, भरत पाटील , गौरव बोरसे , पास्कल कम्प्युटरचे संचालक धनराज अग्रवाल, अरबाज बेग तसेच पोलीस ठाणे नांदगाव येथील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
No comments:
Post a Comment