नांदगाव (प्रतिनिधी ) - महात्मा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह देशातील नव्हे तर जगातील प्रत्येक महापुरुषांच्या यशामागे त्यांच्या आईचे योगदान आहे. आजच्या स्त्रीने देखील भविष्यात याच महिलांच्या आदर्श घेऊन मार्गस्थ व्हावे. देशाचं भविष्य त्यांच्याच हातात असल्याचे मत सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक शाहिद अख्तर यांनी व्यक्त केले. फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच ही उर्दू शाळा असली तरी सर्वच महापुरुषांच्या जयंती आम्ही साजरा करत असतो असेही त्यांनी सांगितले. यावेळी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी,शिवकन्या संगीता सोनवणे , आशाबाई काकाळीज, शिक्षण मंडळ अधिकारी गणेश पाटील,रिपाई नेते कपिल तेलुरे,फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच कार्याध्यक्ष फिरोज शेख,काजीसेवासंघ जिल्हाध्यक्ष वसीम काजी, मनसे मनमाड शहरउपाध्यक्ष जाकिर पठाण, उपशिक्षिका श्रीमती शगुफता मॅडम , शाह जाकेरा मॅडम , शेख फौजिया, शेख साजेदा , शेख अंजुम मॅडम तसेच इस्माईल सर , फुरकान सर पत्रकार महेश पेवाल, नानु कवडे, रमाकांत सोनवणे, रंगनाथ चव्हाण , कपिल तेलुरे , मोहम्मद शेख मान्यवर उपस्थित होते. यावेळी इयत्ता सातवी च्या मुलींनी स्वागत गीत सादर केले.
यावेळी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वच राष्ट्रीय महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन तरुणांनी वाटचाल करावी . जेणेकरून देशाचे भवितव्य सुधारेल असे मत व्यक्त केले.फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी अफजलखान यांचा खात्मा केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई अर्थात माँसाहेब जिजाऊ यांनी त्यांना सांगितले की जोपर्यंत अफजलखान जिवंत होता तोपर्यंत तो दुष्मण होता आता त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला माणुसकी नात्याने दफनविधी करून टाक. ही शिकवण जिजाऊनी दिली आहे अशीच शिकवण सध्या गरजेची आहे असे मत व्यक्त केले.कपील तेलुरे यांनी विद्यार्थ्यांना जिजाऊं कोण होत्या आणि त्यांचे काय कार्य होते याबाबत मार्गदर्शन केले.शिवकन्या संगीता सोनवणे यांनी यावेळी जिजाऊंच्या आयुष्यावर भाषण करून प्रत्येक महिलेने जिजाऊ, सावित्रीबाई फुले , माता रमाई यांच्या पावलावर पाऊल ठेवावे. आदर्श निर्माण करावा असे मत व्यक्त केले.यावेळी शाळेच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अनिल धामणे यांनी केले.
No comments:
Post a Comment